
पुणे, विशेष प्रतिनीधी/वैजनाथ स्वामी। पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. हिरेमठ हे महाराष्ट्र केडरचे 2007 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

त्यांनी यापूर्वी पुणे आणि पिंपरी पोलिस आयुक्तालयात पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणून काम पाहिले आहे. सोलापूर पोलिस आयुक्तपदाचा कार्यभारही त्यांनी काही दिवस सांभाळला होता. सध्या ते महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) तैनात आहेत.

आता प्रतिनियुक्तीवर असलेले डीआयजी हिरेमठ पुढील ५ वर्षे सीबीआयमध्ये कर्तव्य बजावणार आहेत. यासंदर्भातील आदेश भारत सरकारने जारी केला आहे.

