
उस्माननगर| अखंड भारताचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या देखाव्याने गावकऱ्यांचे मन वेधून घेत होते.

” अश्वारूढ बाल छत्रपती शिवाजी महाराज, भालदार, चोपदार, चवरी, मावळ्यांच्या वेषभूषा साकारुन लेझीम सादरीकरण उस्माननगर मधील सम्राट अशोक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सवात रविवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांची मने जिंकली. यावर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त सम्राट अशोक शाळेच्या वतीने प्रथमच शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करवून शिवजन्मोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करुन गावकरी मंडळी च्या कौतुकास पात्र ठरले.

बसस्थानक परिसरात भगव्या ध्वजासमोर शिवजयंती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख जयवंत काळे, श्रीमती वांगे, चेअरमन संजय वारकड, सरपंच गयाबाई घोरबांड, ग्रामसेवक श्रीमती शिंदे, आदींची उपस्थिती होती. सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे, सह शिक्षक देविदास डांगे, भगवान राक्षसमारे ,मन्मथ केसे , नितिन लाटकर, शकील शेख, समता जोंधळे, मणिषा भालेराव, सौ.सोनकांबळे सह सहकारी शिक्षकांनी हा अभिनव उपक्रमतही सुट्टी असताना सादर करून पालकांसह गावकरी व तरुणांची मने जिंकली.

सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या संकल्पनेतून रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून घोड्यावर बसून त्यांच्या मागे व पुढे राहणारे मावळे व त्यांच्या स्वतःसाठी लेझीम पथक रूम हर्षद देखावाने मनमोहन गेले होते गावातील प्रमुख मार्गाने समाज अशोक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या गीतावर रॅली काढली होती.छत्रपती शिवाजी महाराजांची छबी पाहण्यासाठी गावकऱ्यांनी जागोजागी गर्दी केली होती.

