
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे लाठ ( खु ) ता.कंधार येथील प्रगतीशील शेतकरी संतोष गवारे यांचा कुलगुरू डाॅ.इंद्र मणी मिश्रा (वसंतराव नाईक मराठवाडा परभणी ) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तालुक्यात दुसऱ्यादा प्रगतशील शेतकऱ्यांस पुरस्कार मिळाल्याने सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र मार्फत आयोजित कृषिवेद कृषीमहोत्सव सगरोळी येथे पार पडला.दि.17 फेब्रुवारी रोजी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान डॉ. इंद्र मणी मिश्रा कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा परभणी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावर, डॉ. राम चव्हाण, चेअरमन प्रमोद देशमुख, सुनील देशमुख, शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणवार उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत दरवर्षी कृषीवेद या नावाने कृषीमहोत्सव आयोजित केला जातो. विविध पिकांचे पीक प्रात्यक्षिक, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, तज्ञांचे मार्गदर्शन, महिला मेळावा आयोजित करण्यात येतो तसेच विविध स्टॉल या ठिकाणी भरविण्यात येतात.

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आधुनिक व नावीन्यपूर्ण पद्धतीने शेती करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. इतर शेतकऱ्यांना आधुनिक पीक पद्धतीचे ज्ञान मिळावे,प्रेरणा मिळावी या हेतूने हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी कृषी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी डॉ. इंद्र मणी मिश्रा कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे प्रशस्त पत्रक व गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

तालुक्यातील सन्मानित शेतकरी
शिवशंकर सदाशिव धोंडगे बाचोटी – जिरेनियम शेती , संतोष प्रभाकर गवारे लाठ खु.- आधुनिक पद्धतीने शेडनेट मध्ये भाजीपाला बिजोत्पादन , गणेश अप्पा हम्पल्ले काटकळंबा – सीताफळ लागवड , विश्वनाथ लाडेकर, रामकिशन भगवान केंद्रे अनुक्रमे घोडज व आनंदवाडी – आधुनिक पद्धतीने भाजीपाला उत्पादन. आदी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या या स्तुत्य उपक्रमामुळे
तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेती पद्धतीचे प्रसार होऊन इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा मिळण्यास मदत होईल. *संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ वेळोवेळी शेतकऱ्यांना आधुनिक पीक पद्धतीचे मार्गदर्शन करतात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घेऊन पारंपारिक पिकाऐवजी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास निश्चितच बदल होईल*. संतोष गवारे लाठ खु.

