
वडगाव/पोटा, पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना गावाचे दोन युवक दुचाकीवरून भोकरकडे जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका बोलेरो जीपने दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना तालुक्यातील मौजे पारवाबु. बस स्टॉप नजीक दिनांक 20 फेब्रुवारी रोज सोमवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास घडली. यात एक युवक जागीच ठार झाला, तर एक जण युवक गंभीर जखमी झाला होता गंभीर जखमी असलेल्या युवकांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असताना त्यांचीही तेथे उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली शोकाकुल वातावरणात दोन्हीही युवकावर गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना गावाचे दोन युवक दुचाकीवरून भोकरकडे जात होते. दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो जीप क्रमांक एम एच १५ – सीसी २४५९ ने पारवा बु बस स्टॉप नजीक दुचाकीला जबर धडक देऊन उडविले आहे. या अपघातात मौजे पवना येथील युवक प्रवीण उर्फ चिकू अनंतराव गायकवाड वय २४ वर्ष हा जागीच ठार झाला असून, दुचाकीवरील दुसरा युवक अजय शंकू राऊत वय २४ वर्ष हा गंभीर जखमी झाला होता. त्या गंभीर जखमीला तातडीने भोकर येथील रुग्णालयात उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी नांदेडला हलवीण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला प्रवीण गायकवाड या युवकांचा अंत्यविधी रात्री अकरा वाजता करण्यात आला. तर नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू पावलेला अजय शकु राऊत यांचा अंत्यविधी सकाळी साडे अकरा वाजता शोकाकुल वातावरणात करण्यात आला.

अपघात घडताच बोलेरो जीप चालक हा वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती गजानन भिसीकर, गंगाधर पडवळे यांनी हिमायतनगर येथील भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांना दिली. त्यांनी लागलीच हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर याना माहिती कळवीली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः आणि पोलीस कर्मचारी श्याम नागरगोजे, करंजी बीटचे कदम, पोलीस नाईक चुकेवाड यांना घेऊन फरार झालेल्या वाहनाला पकडण्यासाठी पाठलाग केला. आणि सदरील वाहनाला हिमायतनगर नजीक असलेल्या रेल्वेगेट समोरील पळशीकर यांच्या वे-ब्रिज जवळ पकडण्यात यश आले आहे. सदरील वाहन आणि अपघात करून फरार झालेला चालक रोहित राजू आदिवासी त्यांच्या सोबत असलेला राजू मिलालसिंग गौड आदिवासी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हि अपघाताची घटना तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून, अपघाताची माहिती मिळताच तामसा ठाण्याचे एपीआय दळवी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तात्काळ जखमीला रुग्णालयात पाठविले. या घटनेबाबत मयताच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर अपघात प्रकरणी गुन्हा दाखल कायेण्याची प्रक्रिया सुरू होती. शोकाकुल वातावरणात पवना गावकऱ्यांनी या दोन्ही तरुण युवकावर अंत्यसंस्कार केले गेल्या दीड महिन्याखाली ही भोकर तालुक्यात आजोबा आणि नातू यांचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तेव्हाही या गावावर मोठी शोक काळा पसरली होती असे गावकऱ्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.
