
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाशिवरात्रीपासून हिमायतनगर येथील यात्रा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे, तर शहरातील अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत असून, या दरम्यान काही युवकांनी परमेश्वर गल्लीमध्ये गोंधळ घालून बांधकामाचे साहित्य भिरकावून शांतात बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. असले प्रकार माझ्या कार्यकाळात खपवून घेतले जाणार नाहीत, यात जो कुणी दोषी असले त्यांचा तपास लावून त्यांना अद्दल घडविणार जाईल. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, त्यामुळे गावातील प्रमुख लोकांनी पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अन्यथा कायदा व सुव्यवस्था बाधित करून वातावरण दूषित करणाऱ्यांची कदापी गैर केली जाणार नाही अश्या कडक सूचना भोकर डिव्हिजनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांनी दिल्या.

त्या हिमायतनगर येथिल पोलीस ठाण्यात दि.२१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, जमादार अशोक सिंगणवाड, डीएसबीचे अविनाश कुलकर्णी, तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवर यात महाविरचंद श्रीश्रीमाळ, माजी जी.प.सदस्य समद भाई, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, अश्रफ भाई, अन्वर खान, विठ्ठल ठाकरे, गजानन चायल, संतोष गाजेवार, प्रकाश रामदीनवार, विलास वानखेडे, मुन्ना शिंदे, गोविंद शिंदे, असद मौलाना, मनानं भाई, जफर लाला, आदींसह पत्रकार व शहरातील विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना डीवायएसपी शफकत आमना म्हणाल्या कि, आजपर्यंत गावातील सर्व नागरिक एकोप्याने राहतात, परंतु काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे गाव आणि शहराची शांतता भंग होत आहे. या सर्व गोष्टीला कोण जबाबदार आहेत, त्यांची नावे पोलिसांना द्यावीत जेणेकरून अपप्रवृत्तीच्या लोकांना अद्दल घडून पुन्हा गोंधळ होणार नाही. महिला मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे आहेत, टवाळखोऱ्याना आवर घालण्यासाठी आमचे पोलीस सक्षम आहेत. कायद्यानुसार कुणी कुणाबरोबर जायचे ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यासाठी कुणीही कायदा हातात घेता काम नये. कोणतीही घटना घडल्यास पोलिसाना माहिती द्यावी, पोलीस त्यानुसार कार्यवाही करतील. पोलीस कार्यवाही करताना कोणत्याही जबाबदार व्यक्तींनी दोषींची शिफारस करू नये. त्यामुळे चुकीचे काम करणाऱ्या युवकाचे मनोबल वाढून त्यांच रूपांतर गुंडगिरीमध्ये होते. आम्ही कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊनच काम करतो. परंतु काहीजण पोलिसांच्या कामात अडथळे निर्माण करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करतात. असे प्रकार माझ्या कार्यकाळात सहन केले जाणार नाहीत असेही त्या म्हणाल्या.

यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडून शालेय मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी. शहरातील देवस्थान हे धार्मिक ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या मुली येथे थांबतात. परंतु काही टवाळखोर शाळा, कॉलेज, आणि मंदिर रस्त्यावर छेडछाड व हातवारे करतात. अश्याना धडा शिकवणे गरजेचे आहे. यासाठी शाळा, कॉलेज परिसर आणि मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. यात्रा उत्सवात अशी घटना होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे. धार्मिक, सण उत्सवात कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेऊन गाणे वाजवायला हवे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कार्यवाही करणे गरजेचे आहे, चाहे तो कोणत्याही समाजाचा असो. कारण दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकांना… ना जात असते ना धर्म…! हिमायतनगर शहरात गेल्या अनेक वर्षाची परंपरा जोपासत हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेमुळं गावगाडा चालतो आहे. अश्या छोट्या घटनांमुळे गावची शांतता भंग होणार नाही. म्हणून गुंडगिरी करून दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांना शासन झाले पाहिजे तरच भाईचारा कायम राहील असे मतही अनेकांनी व्यक्त केले. एकूणच खेळीमेळीच्या वातावरणात शांतात कमेटीची बैठक संपन्न झाली.

शांतता कमिटीच्या बैठकीनंतर हिमायतनगर पोलीस ऍक्शन मोडवर
आज झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीनंतर डीवायएसपी शफकत आमना यांनी अधिकारी – कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन गोंधळ घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून बिल्डिंग मटेरियल व दगडफेक करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे परिसरात नागरिकात भीती निर्माण झाली होती. अश्यांवर कडक कार्यवाही करण्याचा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर लागलीच पोलिसांचे एक पथक शहरातील त्या परिसरात असलेल्या ठीक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. एकूणच हिमायतनगर पोलीस ऍक्शन मोडवर आली असून, गोंद घालून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करण्यामध्ये सामील असलेल्या किती जणांवर कोणत्या प्रकारची कार्यवाही होते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

