Tuesday, March 21, 2023
Home नायगाव महापुरुषांचा आदर्श घेवून काम करावे – डॉ. गोविंद नांदेडे -NNL

महापुरुषांचा आदर्श घेवून काम करावे – डॉ. गोविंद नांदेडे -NNL

जनसेवक स्व.बबन दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ, दरेगाव येथे वृद्धांना आधाराची काठी वाटप

by nandednewslive
0 comment

नांयगाव, रामप्रसाद चन्नावार। छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांनी कधीही जातीभेद मानला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जात पात न मानता भारतीय संविधान लिहून प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला, अशा महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने काम केले तरच समाज सुधारेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले.

दि.१९ फेब्रुवारी रोजी नायगाव तालुक्यातील दरेगाव येथे जनसेवक स्व.बबन खंडू दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ सोनू बबन दरेगावकर यांच्यावतीने वयोवृद्धांना आधाराच्या काठी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता, कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून, सुप्रसिद्ध मराठी हास्य कलावंत मा. गजानन गिरी आणि सौ. गुंजन गजानन गिरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. एन. एम. रानवळकर होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुढे बोलताना पूर्व शिक्षण संचालक डॉ. नांदेडे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्था प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या महापुरुषांनी आंतरजातीय विवाह प्रोत्साहन दिले, त्यांनी जातीपातीला थारा दिला नाही, त्यामुळे आजही त्यांचे नाव अमर आहे. पूर्वीच्या काळात महिलांना सन्मानाने वागणूक दिल्या जात नव्हती, मात्र आता महिलांनी खूप प्रगती साधली आहे.

यापुढे महिलांनीही पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करून आपला अधिकार गाजवावा. पिंपरी महिपाल येथील घटना दुर्दैवी आहे, आंतरजातीय विवाह केल्यानंतर मुलींना मारून टाकण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे यापुढे प्रत्येकाने आंतरजातीय विवाह विरोध न करता प्रोत्साहन दिले पाहिजे, तरच जातीयता नष्ट होईल. शिक्षण घेण्यासाठी वय नसते, प्रत्येकाने जेवढे होईल तेवढे शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण घेतल्याने दारिद्र्य संपते, सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त होतो, उच्च पदावर जाता येते आणि स्वतःची प्रगती साधता येते, त्यामुळे शिक्षणाला महत्त्व देणे गरजेचे आहे.

banner

शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना सुरवातीपासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न दाखवले पाहिजे, केवळ जीवशास्त्र न शिकवता जीवनशास्त्रही शिकवले पाहिजे, विद्यार्थ्यात ध्येय, जिद्द, चिकाटी निर्माण केली पाहिजे. तरच विद्यार्थ्यात काहीतरी बनण्याचे उमेद निर्माण होईल. त्याचबरोबर ते पुढे असेही म्हणाले की, सोनू दरेगावकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वयोवृद्धांना आधाराची काठी देऊन खरा आधार दिला त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. यासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे तसेच आपल्या आई- वडिलांचा सन्मान केला पाहिजे, असेही ते म्हणाले. सुप्रसिद्ध मराठी हास्य कलावंत मा. गजानन गिरी, ऍड. एन. एम. रानवळकर, माजी.शिक्षण सभापती मा. शिवराज पा. होटाळकर, जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे, नरंगलचे माजी. सरपंच श्रीहरी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर, याप्रसंगी, मा. मनोहर पवार, मा. बाळासाहेब पांडे, श्रीहरी देशमुख, अविनाश पाईकराव, सौ. संगीता बोंडले, मा. प्रदीप जाधव, सौ. शोभाताई संभाजी पा. शिंदे दरेगाव सरपंच, संतराम रामेशेटवाड, प्रदीप पा. शिंदे, देविदास पा. भोपाळे, प्रल्हाद बैस, पी. बी. वाघमारे, मा. उत्तमराव गवाले, नंदकुमार बेलके, मा. झुडपे सर, उत्तमराव गायकवाड, पांचाळ सरपंच नरंगल, बळीराम सूर्यवंशी, मोहन बैलके, सुनील कांबळे, रवी थोरात, सचिन कपाळे, संजय मुधळे, बालाजी सोनमनकर, मारोती टोंम्पे, गंगाधर रेड्डी,यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी केरबा रामशेटवाड, गुणवंत आमनवाड, विनायक आमनवाड, जीवन आमनवाड, मारोती पा. शिंदे, संभाजी पा. शिंदे, बापूराव पा. चिंचाळे, दादाराव पा. चिंचाळे, गोविंदराव पा. शिंदे, बापूराव पा. शिंदे, आनंदराव पा. शिंदे, केशव पा. शिंदे, राजू पा. शिंदे, सुभाष आमनवाड, जळबा शिंदे, केरबा भोपाळे, भगवान आमनवाड, श्यामराव रामशेटवाड, गणेश गजेलवाड, सदाशिव कानगुले, दिगंबर घोणशेटवाड, नारायण बैलके, पंडित पा.शिंदे, नरहरी कानगुले, विजय घोणशेटवाड, रामेश्वर घोणशेटवाड, मधुकर वाघमारे, शिवाजी पा. शिंदे, पिंटू पा. शिंदे, दासू गजेलवाड, गोविंद रामशेटवाड, विठ्ठल पा. शिंदे, सतीश शिंदे, दत्ता बैलके, उत्तम बैलके, शुभम बैलके, सतीश बैलके, सचिन बैलके यांच्यासह परिसरातील व दरेगाव येथील सर्व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू दरेगावकर यांनी केले तर आभार प्रा. गोविंद दरेगावकर यांनी मांडले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!