
नांदेड। नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तालुकानिहाय सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.सदस्य नोंदणीची जबाबदारी उपाध्यक्ष,जिल्हा संघटक व अन्य पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष व सचिव हे सदस्य नोंदणी करून घेणार आहेत.सदस्य होण्यासाठी काही नियम घालण्यात आले असून त्याची पूर्तता करणाऱ्यानाच सदस्यत्व बहाल करण्यात येणार आहे.जास्तीत जास्त पत्रकारांनी सदस्य नोंदणीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी केले आहे.

मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न , नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी दिनांक 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुका स्तरावर सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे . प्रत्येक तालुक्यावर सदस्य नोंदणीची जबाबदारी उपाध्यक्ष, जिल्हा संघटक व अन्य पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली असून यात नांदेड शहर आणि तालुक्यासाठी सुनील पारडे, सतीश मोहिते, माधव गोधने आणि शिवराज बिच्चेवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

धर्माबाद आणि बिलोली तालुक्यासाठी जी पी मिसाळे राजेंद्र कांबळे, हादगाव आणि हिमायतनगर तालुक्यासाठी प्रकाश जैन, सुनील व्यवहारे, नायगाव आणि देगलूर तालुक्यासाठी रामचंद्र भंडरवार, पंडित वाघमारे ,सुभाष पेरकेवार, भोकर, उमरी तालुक्यासाठी एल.ए.हिरे, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यासाठी प्रताप देशमुख, माहूर आणि किनवट तालुक्यासाठी फुलाजी गरड तर मुखेड कंधार आणि लोहा तालुक्यासाठी संदीप कामशेटे, गणेश लोखंडे आणि रत्नाकर महाबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हे सर्व पदाधिकारी त्या त्या तालुक्यावरील तालुकाध्यक्ष आणि सचिवांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी करून घेणार आहेत. पत्रकारांच्या विविध समस्या आणि अडचणी सोडून घेण्यासाठी आणि पत्रकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी अधिकाधिक पत्रकारांनी सदस्य नोंदणीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी ,जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे , जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी केले आहे.

