
मुंबई। मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सरचिटणीसपदी रत्नागिरी येथील पत्रकार, दूरदर्शन प्रतिनिधी दीपक भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल..

डिजिटल मिडियातील पत्रकारांचे राज्यव्यापी संघटन करून डिजिटलच्या पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी भागवत यांच्यावर सोपविण्यात आली आहे.. ठोस भूमिका घेणारे, निर्भीड पत्रकार अशी त्यांची ओळख आहे..
एस.एम देशमुख, किरण नाईक, मिलिंद अष्टीवकर, विजय जोशी यांनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे..

राज्यातील १८ जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या असून ज्यांना परिषदे बरोबर काम करायचे आहे अशा पत्रकारांनी तातडीने संपर्क करण्याचे आवाहन राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे…

