
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हदतील सिडको व ग्रामीण परिसरात २१ फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्य लातूर बोर्डाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षांना सुरळीत सुरुवात, झाली असून, अनेक परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्यांनी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत सुरूवात झाली असून ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे व ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्तात सुरळीत सुरुवात झाली आहे, पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी राऊत व बोर्ड सहाय्यक संचालक फडके व भरारी पथकाने भेटी दिल्या.

बारावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली यात ग्रामीण पो स्टे हद्दीतील सिडको भागातील शिवाजी उच्य माध्यमिक विद्यालय सिडको इंदिरा गांधी उच्चमाध्यमिक विद्यालय सिडको, कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको , वंसतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड , शिवशक्ती उच्च माध्यमिक विद्यालय काकांडी , वाजेगाव येथील राष्ट्रमाता उच्च माध्यमिक महाविद्यालय व वाघाळा येथील महात्मा फुले क.म.वि.वाघाळा या केंद्रावर सुरळीतपणे सुरुवात झाली. पहिल्या दिवशी इंग्रजी पेपरला अनेक केंद्रावर परीक्षार्थ्यांनी परिक्षा दिली, केंद्र प्रमुख म्हणून प्रा.एस.एम.देवरे, एस.जे.चाटे, ए.एम.केद्रे, प्रा.एन.पी.दिण्डे, प्रा.संदीप देवकाते, लोनवडे बी.व्हि, पोहरे भास्कर काम पाहत आहेत,तर बेठे पथकाचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली .

परीक्षा केंद्रावर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. तर भय मुक्त व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरुवात झाल्या. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरला अनेक केंद्रावर परीक्षार्थ्याची अनुपस्थिती होती, जिल्हाधिकारी राऊत लातुर शिक्षण बोर्ड चे सहाय्यक सचिव फडके, गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागाचे पोकळे, यांनी सिडको परिसरातील कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,व शिवाजी उच्च माध्यमिक विघालय सिडको व वाघाळा येथील महात्मा फुले क. म. वि. येथे भेट देऊन क्रेदांवर पाहणी करून समाधान व्यक्त केले.

