नांदेड। आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने रेशन कार्ड साठी तीनवेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून सिद्धापत्रिका मिळवून घेतल्या आहेत.
मौजे खुरगाव,चिखली,नांदुसा आणि नांदेड शहरातील महिलांचे प्रश्न घेऊन आंदोलने केली आहेत. रेशन कार्ड,घरकुल,लघु उधोगासाठी कर्ज व घरेलू कामगारांना सानुग्रह अनुदान वाटप करावे या सह इतरही मागण्या प्रशासनाकडे केल्या होत्या.चाळीस वर्षांपासून खुरगांव येथील महिलांना रेशन कार्ड मिळालेले नाहीत. ते मिळावेत म्हणून आंदोलनाच्या रेट्यासह पाठपुरावा अखंड सुरूच होता.
शेवटी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडित महिलांना रेशनकार्ड वाटप केले आहेत.चाळीस वर्षांपासून शासकीय अन्न धान्य व इतर सुविधा पासून वंचीत असणाऱ्या महिलांना रेशनकार्ड मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे.रेशनकार्ड मिळालेल्या पैकी जास्वंदी गंगातिरे,विद्या पाटणे, सुरेखा गंगातिरे,भाग्यरता लेंडाळे,लक्ष्मीबाई पाटणे ह्या तहसील कार्यालयात उपस्थित होत्या.राहिलेल्या महिलांचे रेशनकार्ड लवकरच देण्यात येतील असे आश्वासन पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहे.
माहूर तालुक्यातील वन मजूरांचे प्रश्न दिलेल्या आश्वासना प्रमाणे वन विभाग सोडवित नसल्याने येत्या २३ फेब्रुवारी पासून जनवादीच्या महिला जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अमरण उपोषण आणि बेमुदत धरणे आंदोलन अरंभ करीत आहेत.यापूर्वी या महिलांनी वन विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलने करीत लेखी तक्रारी केल्या आहेत.
माहूर वन परीक्षेत्र अधिकारी जाधव यांनी कर्तव्यात कसूर केला असल्यामुळे व त्यांचे अग्निशस्त्र सहा महिन्यापूर्वी चोरीला गेले आहे. ते अग्निशस्त्र अद्याप मिळून आले नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून ते कर्तव्यावर कसे राहू शकतात असा गंभीर प्रश्न महिला संघटनेने करीत त्यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी केली आहे.
अ.भा.जनवादी महिला संघटनेची भात्रभावी असलेल्या सीटू कामगार संघटनेच्या वनमजू्रांसाठी पुन्हा महिला आंदोलनास सज्ज झाल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा जमसंच्या निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड, तालुका अध्यक्षा कॉ. लता गायकवाड,कॉ.मनीषा धोंगडे, कॉ.लक्ष्मीबाई हातागळे आदी करीत आहेत.