नवीन नांदेड। संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या वर्षांपासून विविध वक्त्यांचे मार्गदर्शन सिडकोत राबविण्यात आले त्याच प्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सवा निमीत्त महाराष्ट्रातील नामवंत पुरोगामी विचाराच्या निर्भीड रोखठोक वक्त्या शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मा अंधारे व्याख्यान होणार आहे असे संभाजी ब्रिगेड ने कळविले आहे.
संभाजी ब्रिगेड च्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सिडको जिजाऊ सृष्टी येथे शिवजन्मोत्सवानिमीत्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्याचप्रमाणे याही वर्षी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते शिवानंद भानुसे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूख अहेमद यांचेही मार्गदर्शन शनिवार दि २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता जिजाऊ सृष्टी सिडको येथे होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन थोरात उद्घाटक म्हणुन उपस्थित राहणार आहेत मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील डक, सहसंपर्कप्रमुख धोंडु पाटील, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, संभाजी ब्रिगेड चे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख उमाकांत उफाडे,मराठा सेवा संघाचे प्रदेश सहसचिव डॉ पंजाब चव्हाण आदिंची विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हात्तीअंबिरे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, शिवसेनेचे महानगराध्यक्ष पप्पु जाधव, शिवसेना शहराध्यक्ष आर्जुन ठाकुर, शिवसेना शहराध्यक्ष गौरव कोडगीरे, वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष आय्युब खान, शिवसेनेचे सिडको शहरप्रमुख जितुसिंघ टाक आदि प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप गुबरे, लोकसभा सचिव दीपक भरकड, कमलेश कदम, अविनाश शिंदे, महानगराध्यक्ष सतीश धुमाळ, सिडको अध्यक्ष गजानन शिंदे, गजानन पवार,अशोक कदम,भुजंग जाधव,आंकुश कोल्हे, परमेश्वर खोसे, ज्ञानेश्वर शिंदे,राम मोरे,मयुर अमिलकंठवार,मारोती मेंडेवाड, अभिमन्यू पंडीत,संजय जाधव,कीशन मोरे,दीलीप दळवी आदिंनी केले आहे.