लोहा| माळाकोळीचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक डोके यांनी केलेला माळेगाव यात्रा बंदोबस्त अतिशय लक्षवेधी ठरला. त्यांची बदली शिवाजी नगर नांदेड येथे झाली तर लोहा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गफार सलील शेख यांची मांडवी पोलीस ठाण्यात, रविंद्र कन्हे हे सद्या उमरी येथे संलग्न आहेत. त्यांना विमानतळ पोलीस स्टेशन देण्यात आले आणि लोह्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती सोनकांबळे यांची कंधार येथे बदली झाली आहे.
माळाकोळी पोलीस ठाण्याचे प्रभारी माणिक डोके यांनी पोलीस ठाण्याचा परिसर देखणा केला आहे. त्याचा कायापालट केला शिवाय त्यांनी कार्यकाळात केलेली कामगिरी वाखाण्याजोगी होती. यात्रा सुरळीत पार पडली त्यांना शिवाजी नगर पोलीस ठाणे देण्यात आले तर त्यांच्या जागी वजीराबाद येथून संजय निलपत्रेवार येत आहेत.
लोहा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गफार खलील शेख यांची मांडवी पोलीस ठाण्यात ‘प्रभारी’ म्हणून बदली झाली. पोलीस निरिक्षक संतोष तांबे हे बियाणी खून प्रकरणात महत्त्वाच्या तपास पथकात होते. त्या काळात श्री शेख यांनी काम पाहिले त्या अनुभवांचा त्यांना फायदा होणार आहे. तर सपोनि रविंद्र कन्हे यांचा कार्यकाळही समाधानकारक होता. त्यांनी लाकडाऊन काळात परिस्थिती सुलभतेने हाताळली. काही काळ उमरी येथे ते सलग्न होते. आता बदलीत त्यांना विमानतळ पोलीस ठाणे देण्यात आहे.
पदोन्नती व तत्पूर्वी लोहयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मारुती सोनकांबळे यांची कंधार पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर पीएसआय व्यंकट गंगलवाड येत आहेत. पीएसआय कृष्णा रामभगत काळे हे नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यांची लोहा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. लोहा पो.स्टे. येथे गेला दोन वर्षापासून पोलीस निरिक्षक संतोष तांबे हे कार्यरत आहेत.
अनेक घटना त्यांनी कुशलतेने हाताळल्या आहेत. शिवाय बियाणी हत्या प्रकरणात त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका तपासा दरम्यान बजावली. या पोलीस निरिक्षकांच्या बदलीत मात्र त्यांना’ जैसे थे ठेवले आहे. लोह्यातील दोन सपोनि यांची बदली झाली पण एकाही समकक्ष अधिकारी त्यांच्या जागेवर बदलून आले नाहीत त्यामुळे तूर्त हे दोन्ही पदे रिक्त राहणार आहेत.