
नवीन नांदेड।छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवशाहीर गजानन जाधव यांचा शाहिरी जलसा व पोवाड्याचा कार्यक्रमास नागरीकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्ये पोवाडे व शाहीरी जलसास उपस्थित नागरीकांनी टाळायचा गजरात प्रतिसाद दिला.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सिडको येथील जिजाऊ सृष्टी येथे २१ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाच्ये आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सार्वजनिक शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष शिवश्री सुभाषराव सूर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री प्रवीण पाटील चिखलीकर तसेच माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे ,भाजप युवा मोर्चा जिल्हा शहरध्यक्ष संजय पाटील घोगरे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष त्र्यंबक कदम जिजाऊ सृष्टी प्रतिसाद यांचे अध्यक्ष सोपानराव पांडे संभाजी ब्रिगेडचे लोकसभा विभागीय अध्यक्ष संकेत पाटील तसेच मधुकर गायकवाड उपस्थित होते. यावेळी शाहीर गजानन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व प्रसिद्ध असलेले पोवाडा गाऊन उपस्थित नागंरिकाची मने जिंकली तर शाहीरी जलसा मुळे उपस्थित नागरीकांनी टाळयाचा प्रतिसाद दिला.

प्रांरभी शिवश्री सुबोध पाटील यांनी जीजाऊ वंदना गायली यानंतर उपस्थित मान्यवराचे स्वागत करण्यात आले, यावेळी शिवजन्मोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक गटात लेझीम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धा मधील माध्यमिक लेझीम पथकात इंदिरा गांधी हायस्कूल हडको प्रथम आले तर राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी द्वितीय प्राथमिक गटातून छत्रपती शिवाजी विद्यालय सिडको यांना पहिले पारितोषिक मांन्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र रोख बक्षीस देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी सचिव गजानन शिंदे, सहसचिव दिपक भरकड ,कोषाध्यक्ष गोविंदराव मजरे, वसंत कदम, अशोक कदम उपाध्यक्ष कोंडीबा पाटील घोरबांड ,कार्याध्यक्ष गजानन पवार, मराठा सेवा संघ सिडको चे अध्यक्ष शिवश्री त्र्यंबक कदम, साहेबराव गाढे ना ही उमाटे उत्तमराव जाधव सोपानराव पांडे, नामदेवराव चव्हाण, चंद्रकांत मोरे, दिलीपराव कदम ,यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री उत्तमराव जाधव यांनी केले. तर आभार शिवश्री त्र्यंबक कदम यांनी मानले.

