
नवीन नांदेड| शिवजन्मोत्सव समिती वांगी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी यांच्या संयुक्त विद्यमाने “सांस्कृतिक महोत्सव 2023” आयोजित करण्यात आला,यात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन करुन प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन दक्षिण नांदेडचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. मोहन अण्णा हंबर्डे यांचे हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. प्रमुख अतिथी मनोहर शिंदे सदस्य जि. प. नांदेड, तर विशेष उपस्थिती साहित्यिक तथा व्यकटेश चौधरी , गटशिक्षणाधिकारी व अर्धापूर तथा शिक्षण विस्तार अधिकारी बीट वाजेगाव, राजु काळे पाटील मनपा नगरसेवक ,प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक तथा ललीत कला अकादमीचे संस्थापक अतुल येवतीकर ,दत्ता जाधव सरपंच ग्रा. प. वांगी, विनायक जाधव अध्यक्ष शा. व्य. स. वांगी, गंगाधर जाधव अध्यक्ष शिवजन्मोत्सव समिती, मा. श् संजय जाधव उपाध्यक्ष, राहुल जाधव सदस्य शिवजन्मोत्सव समिती वांगी यांची विशेष उपस्थिती होती.

कुळवाडी भूषण व बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन दक्षिण नांदेडचे लाडके आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी केले. सांस्कृतिक महोत्सव 2023 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक व्यंकट गंदपवाड यांनी केले. यात विद्यार्थ्यांनी झुलवा पाळणा, ‘चॉकलेटचा बंगला,घूमर घुमर , विठ्ठल विठ्ठल या गितातून वारीचे प्रत्यक्ष दर्शन करून दिले. मी जिजाऊ बोलते,राज आलं राज आलं, मल्हार मल्हार, या गीतावरील बहारदार नृत्य सुरुवात करत जलवा, पिया पिया गुबु गूबू वाजतय, रंगीला मारो ढोल ,डोला रे डोला, पुष्पा रिमिक्स यासारखे एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्य सादर करत प्रेक्षकांना जागेवरच खेळवून ठेवले. पोलीसवाल्या सायकलवाल्या, या गीतावर विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य सादर करून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला,

ग्रामीण व शहरी सुनबाई व कॉमेडी बातम्या या विनोदी नाटिकेच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. तसेच “प्रतापगडावरील पराक्रम” या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने संपूर्ण इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा केला. गेली माझी सखी बायको गेली.., हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला ,फिर हेरा फेरी ,या विनोदी नृत्याला प्रेक्षकांची भरपूर दाद मिळाली. पिवळा पितांबर, ढोलकीच्या तालावर ,डोला रे डोला, तानाजी रिमिक्स व गुबू गुबू वाजतय या गीतावर बालकलाकारांनी प्रभावी नृत्य सादर करून प्रेक्षकांना अंतर्मुख केले. प्रेक्षकांनी या बालकलाकारांची मुक्त कंठाने प्रसन्न केली आणि बक्षिसांच्या बरसातीची सुरुवात केली.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी वांगी गावचे युवा सरपंच तथा जिल्हाध्यक्ष विखे पाटील कृषी परिषद नांदेड तथा सरपंच दत्ताभाऊ जाधव यांनी शाळेस इन्व्हर्टर व शिवसेना तालुका उपप्रमुख सुरेश सुदाम जाधव यांनी शाळेसाठी एलईडी तसेच माजी सरपंच पद्माकर तारू यांनी सुद्धा एलईडी टीव्ही भेट दिली. त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती वांगी तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मदत व्हावी या हेतूने म्युझिक सिस्टम देण्याचा संकल्प केला.

सदर कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव पाटील जाधव, उपाध्यक्ष श्री. नागोराव पाटील जाधव,माजी उपसरपंच अशोक पाटील जाधव, माजी शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी गाढे, माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाराव जाधव, गोविंदराव जाधव गुरुजी ,उपाध्यक्ष रुखमाजी जाधव, तलाठी ईश्वरकुमार मंडगिलवार, तसेच सर्व सदस्य, शिवजन्मोत्सव समिती कार्याध्यक्ष गणेश श्रीराम जाधव, आनंदा जाधव, तिरुपती जाधव, सहसचिव निलेश जाधव ,सदस्य तुकाराम जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुदर्शन जाधव,हनुमान जाधव, संभाजी जाधव,गणेश गायकवाड, युवराज जाधव, राजू जाधव, युवराज खोंडे माणिक जाधव, गंभीर जाधव श्री. प्रशांत जाधव लखन जाधव लक्ष्मण जाधव,तसेच इंजेगावचे सरपंच बालाजी ठोके मुक्ताजी शहापुरे, बाबुराव जाधव, बालाजी जाधव, मंगेश जाधव, कोब्रा गँगचे सर्व सदस्य, राजू तारु,सचिन जोगदंड, मिलिंद कांबळे, , सदाशिव कर्डिले ,बालाजी सपोरे, साईनाथ कर्डिले ,गजानन म्हस्के, रामेश्वर गुडगे,सुरेश कदम, यांच्यासह सर्व गावकरी मंडळी यांनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी वन्नाळी येथील उपक्रमशील पदवीधर शिक्षक संगमेश्वर पडलवार ,बेळकोणी येथील उपक्रमशील दिगंबर राजाबोईनवाड , उपक्रमशील शिक्षिका सौ.सुचिता सिंगरवाड गंदपवाड,कृषी विभागातील कनिष्ठ लिपिक नारायण गंदपवाड, ग्रामसेविका संपदा कोनेरी गंदपवाड, उमरी येथून वैष्णवी सिंगरवाड ,शिरड येथील उपक्रमशील शिक्षिका सौ.ज्योती किर्तनकार स्वामी, उपक्रमशील शिक्षक बंडू देशमुख, तुप्पा येथून शिवाजीराव गाडेवाड,सौ.चंद्रकलाबाई गाडेवाड, शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथील अधिपरिचारिका सौ. रत्नमाला कोकाटे गाडेवाड, उपक्रमशील शिक्षक रुपेश गाडेवाड, तुकाराम कऊठकर, संगमेश्वर बिंदगे यांचे सह सर्व गावकरी मंडळी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव समिती व शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक अजित कदम श्री. रुपेश गाडेवाड ,सारंग स्वामी, गणपत मुंडकर ,तुकाराम कऊटकर, अजय ठाकुर , अंगणवाडी ताई सौ.अनिता राजू तारु, आरोग्यसेविका सौ.वंदनाताई गजभारे यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक व्यंकट गंदपवाड, सारंग स्वामी यांनी तर आभार तंत्रस्नेही शिक्षक गणपत मुंडकर यांनी मानले.
