
हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाबद्दल ग्राहकात नाराजीचा सूर दिसून येत आहे. वास्तविकता अशी आहे की, धान्य गोदामात येऊनही ग्राहकाला लवकर देण्यात येत नसल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.

स्वस्त धान्य ग्राहकांना नियमितपणे वेळेवर माल न वाटप करणे, शासनाच्या दराप्रमाणे न देता ग्राहकाकडून जास्तीचे पैसे घेणे, तसेच ग्राहकांना पोचपावती सुद्धा न दिली असल्याचे ही जनतेतून बोलल्या जात आहे. त्यांच्या हक्काबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहित नसल्यामुळे याचाच गैरफायदा घेत स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्राहकांची लूट ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचा तक्रार देखील वाढत असताना पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणून भोजन दुर्लक्ष करीत असल्याचे सुज्ञ नागरिकांतून ऐकायला मिळत आहे.

फेब्रुवारी २०२३ या महिन्यांमध्ये हदगाव तालुक्यातील बऱ्याच स्वस्त धान्य दुकानदाराकडे गहू, तांदूळ हा आठ ते दहा दिवसापासून स्वतःच्या दुकानात उपलब्ध असताना देखील स्वस्त धान्य दुकानदारांनी अद्याप वाटप केली नसल्याचे दिसून येत आहे. तर काही हुशार स्वस्त धान्य दुकानदारांनी चोरीच्या मार्गाने पोतेच्या पोते जास्तीच्या दरात गहू, तांदळाची विक्री होत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जाते. त्यानंतर स्वस्त धान्य ग्राहकास वाटपचा कार्यक्रम सुरू करून त्यामध्ये काही ग्राहकाकडून जास्त पैसे घेतात तर काही दुकानदार ऑनलाइन अंगठ्यावर निघणारी पोचपावती ग्राहकांना देत नाहीत.

कारण ग्राहकांना माल किती मिळाला याची माहिती होऊ नये त्यामुळे दुकानदारकाची एकदरीत रित्या मनमानी कारभार चालू असल्याचा प्रकार सध्या हदगाव शहर व तालुक्या मध्ये होताना पाहावयास मिळत असून याकडे हदगाव तहसीलच्या पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत आर्थिक संबंध व धागे दोरे असल्याचे ही ग्राहकातून बोलल्या जात आहे.

सविस्तर माहिती अशी की आपल्याला मिळणारे धान्य हे स्वस्त धान्य दुकानदाराकडून चार आठवड्यांमध्ये कोणत्याही वेळी घेता येते. स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असा कोणताही नियम नाही. स्वस्त धान्य दुकानांमध्ये घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे. कारण पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक देखील असतो. दुकानदाराला रेशन कार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा तो रेशन कार्ड रद्द करण्याचा अधिकार देखील नाही . स्वस्त धान्य दुकानांमध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहितीचे फलक असणे खूपच गरजेचे आहे.

या फलकावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक ,तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद तसेच रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर रेशन कार्ड संख्या व उपलब्ध असलेला मालाचा साठा ही माहिती असणे अनिवार्य आहे. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमध्ये बीपीएल व अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी व धान्याची यादीही दुकानांमध्ये लावलेली असणे आवश्यक असते. ज्या व आपल्याला पाहिजे एवढ्याच वस्तू ग्राहक घेऊ शकतो.

रेशन दुकान हे रोज सकाळी चार तास व सायंकाळी चार तास उघडे पाहिजे रेशन दुकान हे आठवडी बाजाराच्या दिवशी उघडे राहणे आवश्यक आहे. आठवड्यातून फक्त एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकानांमध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असं माहिती फलक असला पाहिजे. ही माहिती हदगाव तालुक्याच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे नसताना सध्याच्या परिस्थिती पाहताना दिसून येते मग याकडे पुरवठा विभागाचे का लक्ष नाही..? याचा अर्थ काय. हदगाव तहसील मधील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याची आर्थिक हितसंबंध व धागे दोरे असल्याचेही सुज्ञ नागरिकांतून बोलल्या जात आहे.
