
नविन नांदेड। नांदेड जिल्हा शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक पदी माजी जिल्हा परिषद सदस्या वत्सलाताई पुयड यांच्यी नियुक्ती एका आदेशानुसार करण्यात आली आहे.या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महिला जिल्हा संघटक पदी माजी जिल्हा परिषद सदस्या वत्सलाताई पुयड यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून भोकर,लोहा कंधार, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हे देण्यात आले असून त्यांनी केलेल्या आंदोलन, विकासासाठी केलेले प्रयत्न,व मतदारासंघातील शिवसेना पक्ष वाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची हि नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल मतदारासंघातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

