उस्माननगर, माणिक भिसे। येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात रयतेचे राजे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत निवडून आलेल्या चेअरमन व सदस्यांचा पत्रकार संघाकडून सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य तथा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय वारकड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शेषेराव पाटील काळम , बालाजी पुंडाजी घोरबांड , पत्रकार संघाचे सचिव प्रदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे हे उपस्थित होते.शिवजयंती प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पत्रकार संघाच्या वतीने नुतन बिनविरोध सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत निवडून आलेल्या चेअरमन संजय वारकड, पत्रकार प्रदीप देशमुख , व एन एम.एन शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले पत्रकार लक्ष्मण कांबळे यांचे चिरंजीव सम्यक कांबळे यांचा शाल श्रीफळ हार घालून त्यांचे सत्कार करण्यात आला.यावेळी प्रदीप देशमुख ,संजय वारकड ,बालाजी पुंडाजी घोरबांड यांनी आपले मनोगतात संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषणे व्यक्त केले.
यावेळी गणेश लोखंडे,माणिक भिसे,लक्ष्मण कांबळे, सुर्यकांत मालीपाटील, अमजद खान पठाण विठ्ठल ताटे, ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे, यांच्या सह नागरिक उपस्थित होते. रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बसस्थानक परिसरात ध्वजारोहण येथील दत्त मंदिरातील महंत गुरू शंकरबन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील प्रमुख रस्त्याने मोटरसायकल वरून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती.विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी ,शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. सम्राट अशोक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी, मिरवणुकीत सादर केलेली देखावे सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली..