
नांदेड। मागील प्रलंबित मागण्या सोडविण्यात येत नसल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 23 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नांदेड रेल्वे स्टेशन येथे कार्यरत असलेल्या जगदेव इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे उप ठेकेदार श्री लोंढे, व्यवस्थापक श्री परनाटे व पीएनबी बँकेच्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व भादवी कलम ४२० नुसार गुन्हे दाखल करावेत. नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्यामंदिर गांधीनगर या शाळेच्या विरोधात मागील दोन वर्षांपासून पुराव्यासहित अनेक तक्रारी दिल्या असून अनेक आंदोलने झाली आहेत.

परंतु गटशिक्षणाधिकारी पं.स. नांदेड शिक्षण अधिकारी (प्रा.) जि.प.नांदेड व नांदेड तसेच महापालिका आयुक्तांनी अर्थपूर्ण हितसंबंधातून अद्याप कारवाई केली नाही त्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करावी व मृत्यूशील झुंज देत असलेल्या सहशिक्षिका आशा गायकवाड व केशव धोंगडे यांना न्याय द्यावा. जमीन मुद्रांक व दस्त नोंदणी घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी आणि भादवी प्रमाणे गुन्हे दाखल करावेत व सर्व दोषींना सेवेतून निलंबित करावे आणि माकपाच्या मूळनिवेदनातील मागण्याप्रमाणे कारवाई करावी.

माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. यांचे अग्निशस्त्र मागील सहा महिन्यापासून गहाळ आहे त्यांनी कर्तव्यात कसूर केला आहे म्हणून त्यांचे अग्निशस्त्र मिळेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस संरक्षण व शस्त्र परवाना संदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर करताना काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. नांदेड जिल्ह्यातील राज्य व केंद्र सरकारच्या विविध कार्यालयातील अनेक अधिकारी कर्मचारी कार्यकाल समाप्त होऊन सुद्धा वशिलेबाजीने आर्थिक लाभाच्या पदावर ठाण मांडून बसले आहेत त्यांची हकालपट्टी करावी जेणेकरून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून पदाचा गैरवापर होणार नाही.

पीडित सोनाजी कांबळे यांचे नांदेड शहरात पुनर्वसन करावे व त्यांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन देण्यात यावी. वझरा शेख फरीद तालुका माहूर येथे गावठाण विस्तार योजना अंतर्गत कुंभारी सोलापूरच्या धर्तीवर नवीन प्लॉट पाडून घरकुल बांधून द्यावेत. महापालिकेचे सफाई कामगार मयेत चांदोबा भिवा भिसे यांचे कर्तव्यावर असताना कोरोना काळात निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी व त्यांच्या एका मुलाला सफाई कामगार म्हणून महापालिकेत नोकरीवर घेण्यात यावे. बजरंग कॉलनी, गुरुनगर, शिवपार्वती नगर,कर्मवीर नगर,खूरगाव, नांदुसा, चिखली व नांदेड शहरातील महिलांची लक्षणे उपस्थिती होती. त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने महापालिका आयुक्त व तहसीलदार नांदेड यांना लेखी कळविण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आले आहे.

या आंदोलनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड कॉ.उज्वला पडलवार, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.मारुती केंद्रे, कॉ.सुभाषचंद्र गजभारे, कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.गंगाधर खुणे, कॉ.दत्ता जोगदंड,जीगीर सिंग गील, कॉ.गोपी प्रसाद गायकवाड, कॉ.अनुसया कांबळे,जयश्री झंपलवाड, लक्ष्मीबाई पाटणे, सुरेखा गंगातीरे, पल्लवी शिंदे, मीना रणखांबे,सावित्राबाई गालफाडे, कविता ठाकूर, कल्पना पांचाळ,शोभा डवरे, बेबीताई सूर्यवंशी, सपना सूर्यवंशी आधी जन नेतृत्व करीत आहेत. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विजया काचावार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हातीअंबीरे पालमकर,प्रा. राजू सोनसळे, रिपब्लिकन सेनेचेअध्यक्ष माधव दादा जमदाडे, प्रेमिलाताई वाघमारे,ऍड.यशोनील मोगले, सामाजिक कार्यकर्त्या शितल भवरे,गांधी आंबेडकर कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड. विष्णू गोडबोले आदींची उपस्थिती होती.

