
मुदखेड/नांदेड। राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, भोळ्या समजुती,अनिष्ठ रुढी व पंरपरा दूर करण्यासह समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले.सोबतच,स्वच्छता व चारित्र्याचीही शिकवण दिली त्यांची शिकवण आणि प्रेरणादायी कार्य व कर्तत्वाचा वारसा प्रत्येकांनी आत्मसात करुन जोपासण्याची गरजेचे असल्याचे मत बार्टीच्या तालुका समतादूत राणीपद्मावती परमेश्वर बंडेवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पूणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जि.प.प्रा.शाळा आमदुरा ता.मुदखेड येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुख्याध्यापिका श्रीमती एन.एस.कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच,त्यांच्या जयंतीनिमित्त शाळा परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला व दररोज स्वतःसह घर,शालेय, गांव परिसर स्वच्छता राखण्याची शपथ घेऊन अनोखे अभिवादन केले. याप्रसंगी पूढे बोलतांना समतादूत राणीपद्मावती बंडेवार म्हणाल्या की,महापुरुषांच्या प्रेरणादायी कार्य व विचारांतूनच या देशात सामाजिक क्रांती घडली असून राष्ट्रसंत गाडगेबाबा स्वतः अशिक्षित असले तरिही वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे महान समाजसुधारक होते.प्रत्येकांच्या मनाचा भाव ओळखूनच त्यांनी आपल्या मायबोली भाषेतून समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, अनिष्ट चाली- रिती व रुढी-परंपरा यावर आपल्या प्रभावी किर्तनाच्या माध्यमातून प्रहार करतांनाच अस्वछता,गांवची घाण दूर सारण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न केले.

त्याचबरोबर, जनतेला शिक्षणाचे महत्वही पटवून दिले त्यांची शिकवण व कार्य प्रेरणादायी असून ते आत्मसात करून जोपासण्याचा निश्चय प्रत्येक नागरिकांनी व या देशाचा भावी आधारस्तंभ असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन करुन समतादूत एँड.राणीपद्मावती बंडेवार यांनी बार्टीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी श्रीमती एम.व्ही. कपाटे,एस.जी.कदम,जी.डी. गूट्टूवार,सौ.व्हि. एस.कवडे, सौ.एम.एस.शेट्टे आदींसह आमदुरा येथील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शिक्षक- शिक्षिका,विद्यार्थी-विद्यार्थिनी आदींची या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थिती होती.

