
उस्माननगर। एक थोर समाजसेवक व राष्ट्रीय संत ज्यांनी प्रत्येक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र दिला.जीवनभर लोकसेवेचे व्रत अंगिकारुन अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद उच्चाटन, सामाजिक न्याय, सार्वजनिक स्वच्छतेबाबत कीर्तनांव्दारे समाज प्रबोधन केले.अंधश्रध्देची कास सोडून विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रूजणारे संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती उस्माननगर येथे विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली.

जिल्हा परिषद कन्या शाळेत मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक ( मुलांची) शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.यावेळी एकनाथ केंद्रे ,गौतम सोनकांबळे , शेख ,सौ.डांगे ,सौ.प्रेमलाबाई गाजूलवाड ,सौ.मिनाक्षीबाई लोलगे ,सौ.पाडोदेकर यांच्या सह शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जिवन चारित्र्यवर प्रकाश टाकणारी मनोगत व्यक्त केले.

समता विद्यालयात मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड, पर्यवेक्षक राजीव आंबेकर सह अनेक शिक्षकांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.यावेळी अनेकांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.ग्रामपंचयत कार्यालय येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक कर्मचारी गजानन देवणे ,संजय भिसे , परमेश्र्वर पोटजळे ,सद्दाम पिंजारी , ओमकार मोरे ,व गावातील नागरिक उपस्थित होते.

