
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

या प्रसंगी ज्या महामानवाने आपल्या प्रबोधनातून जाती, धर्म, पंथ, राष्ट्र, भाषा, यांच्या पलीकडे जाऊन आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सहज भाषेतील उदाहरणे देऊन आपल्या कीर्तनातून मानवतेला श्रेष्ठ मानून आपण सर्वजण एक आहोत असा उपदेश दिला. आणि आपल्या समाज सेवेतून व प्रबोधनातून त्यांनी गावा गावात जाऊन सकाळी हातात झाडू घेऊन गावातील रस्ते साफ केली. व संध्याकाळी किर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने देखील साफ केली. आणि खऱ्या अर्थाने यातूनच त्यांची राष्ट्रभक्ती तथा राष्ट्रप्रेम याची जाणीव होते.

आशा या संत महात्म्याच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, डॉ. दिलीप माने, डॉ. शाम इंगळे, प्रा.एम. पी. गुंडाळे, डॉ. सविता बोंढारे, प्रा. राजू बोंबले, प्रा. शंकर गुंडेवार तसेच महाविद्यालयाचे कार्यालयीन कर्मचारी श्री संदीप हरसूलकर, श्री लक्ष्मण कोलेवाड, श्री राजू सोनकांबळे, श्री साहेबराव असळकर, श्री राहुल भरणे आदी सह विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

