
हदगाव, गजानन जिदेवार। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव-हिमायतनगर या तालुक्यातील ठाकरे गटाचे असंख्य शिवसैनिक म्हणुन परिचित असलेल्या युवती सेनेच्या उपजिल्हाप्रमुख शितल भांगे पाटील सह सरपंच, असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी व महिलांनी मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि खा.श्रीकांत एकनाथजी शिंदे व खा.हेमंत पाटील ,लोकनेते बाबुराव कोहळीकर सह गीते साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी युवती सेना उपजिल्हाप्रमुख भांगे यांच्या सह सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करत त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी बोलताना खा.श्रीकांत शिंदे यांनी असे सांगितले की आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांनी खा. हेमंत भाऊ पाटिल व लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांच्या पाठिशी खंबीर पने उभे राहुन स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेने प्रमाणे 80% समाज कारण व 20% राजकारण करत मतदारसंघातील नागरिकांचे आगामी काळात काम करा व आपल्या भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, व तळागाळातील जनतेच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करून त्यांना मदत करा आशा शब्दात त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

नांदेड जिल्ह्यासह हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील विकासासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे आपल्याला कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सतिश पाटिल पांगरीकर, संदेश पाटील हडसनीकर, युवती सेना उप जिल्हाप्रमुख शितल भांगे पाटील, ॲड.बाळा पाटील सरपंच खैरगाव, मल्हारराव सोळंके सरपंच हस्तरा, ज्योतिबा भांगे पाटील, अमोल दंतपल्ले ॲड.अंजली सोनुले,दुर्गा भारती, अंजली सोनुले, पौर्णिमा हत्तिनगरे सह प्रगती सूर्यवंशी असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

