
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे सवना ज. येथील दृष्टीहिन धोडींबा कांबळे यांचा 18 फेब्रुवारीला नंदीग्राम मधून पडून मृत्यू झाला आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वेतून फिरणार्या दृष्टीहिन फेरीवाल्याने व महाराष्र्ट आंध संघटनेचे अध्यक्ष सय्यद भाई यांनी प्रत्यक्ष कांबळे परिवारांना भेट देवून सात्वन केले. सय्यद भाई यांनी 2 हजार 500 रुपये व दृष्टीहिन फेरीवाले यांनी 4 हजार 100 आणि फय्याद सर यांनी 1000 हजार असे 7 हजार 100 रुपयाची मदत देवून श्रद्धांजली वाहिली.

रेल्वे प्रशासनाकडे धोडींबा कांबळे यांच्या निराधार परिवाराला मदत मिळण्यासाठी रेल्वे डिएमआर व रेल्वेमंञी दानवे यांची महाराष्र्ट अंध संटनेचे अध्यक्ष सय्यद भाई घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले. कांबळे परिवाराला रेल्वे प्रशासनाकडून अंध दिव्यांग, गावकरी यांच्या सहकार्याने मदत मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही असे ही त्यांनी सांगीतले आहे.

सवना ज. येथील दृष्टीहिन अंध धोडींबा कांबळे हे रेल्वेत लहान मुलासाठी खावू व खेळणी विक्री करुन कुटूंबाचा उदर निर्वाह करित असत. त्याची पत्नीही दोन्ही डोळ्यानी आंधळी आहे. तिन दृष्टी असणारे लहान लहान मुले आहेत सासू वयस्क व वेडसर आहे. धोडींबाच्या कुटूंबाला आधार नाही, त्यामुळे कांबळे यांच्या निराधार परिवाराला रेल्वे प्रशासना कडून तात्काळ मदत मिळावी अशी त्यांच्या परिवाराची व गावकर्याची मागणी आहे.

धोडींबा कांबळे परिवाराला गावातून ,बाहेरगावहून मदत मिळत आहे. अशोक अनगुलवार यांनी दहा दिवसाचा किराणा व धान्य् देवून शेतातील 50 किलो गहू धोडींबा काबळे परिवारास दिले आहे. धोडींबा कांबळे परिवार हा जनतेच्या मदतीवरच अवलंबून राहाणार आहे. हिमायतनगर शहरातून काही दानशुर लोकाकडून मदत मिळणार आहे. या प्रसंगी शंकर गीमेकर, संजय सोनुले, गणेश माने ,फयाज सर, यांच्यासह 30/35 दृष्टीहिन दिव्यांग फेरीवाले आणि गावातील लोकमत ता.प्र. अशोक अनगुलवार, आडेलू गुंडेकर, सिताराम गुंडेकर , ग्रा.प. सदस्य गजानन गोपेवाड, रमाबाई राऊत सह गावकरी हजर होते.

