
नांदेड। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 25 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने शिवगर्जना मोहीम राबविण्यात येणार असून नांदेडचे शिवसेना सहसंपर्क प्रकाश मारावार यांना गडचिरोली. चंद्रपूर. यवतमाळ. वाशिम जिल्ह्यासाठी शिवगर्जना मोहिमेचे निरीक्षक म्हणून शिवसेना भवनातून नेमण्यात आले.

शिवगर्जना या मोहिमेत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नांदेडचे प्रकाश मारावार सोलापूरचे शरद कोळी. हर्षल काकडे युवा सेनेचे दुर्गा शिंदे आधी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम या ठिकाणी स्थानिक जिल्हा संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख यांच्यासोबत मेळावे बैठका घेऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीत खंजीर शिंदे गट व भाजप कशा प्रकारे खुपसला.

केंद्र शासनातील प्रशासकीय यंत्रणा हातात धरून शिवसेना पदाधिकारी व ठाकरे परिवार यांना हातबल करण्याचा षडयंत्र हाणून पाडण्यासाठी शिवगर्जना मोहीम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने नांदेडचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सह संपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांचा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम या चार जिल्ह्याचा दौरा दिनांक 25 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला.

