
मुबंई। महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिला जानारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या सोहळ्याचे आयोजन आज मुंबई येथिल रंगशारदा सभागृह वांद्रे येथे करन्यात आले होते.

मुंबई येथिल ऊर्जा फाऊंडेशनचे विश्वस्त तथा हरहुन्नरी असलेले शिक्षक सचिन म्हात्रे यांना या वर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे हस्ते प्रदान करन्यात आला. यावेळी प्रशासनातील अनेक मान्यवर राजकीय मंडळी व शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मान्यवर तथा उर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॅा. विजय जंगम(स्वामी) हे देखिल उपस्थित होते.

सचिन म्हात्रे हे सर्व विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक आहेत यांचे इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असून राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थांना उपयुक्त असलेले लेख व इतर अभ्यासक्रम स्वत: लिखान केलेले साहीत्य अनेक दैनिकाच्या माध्यमातून राज्यभर प्रसारीत करतात. अनेक विषयात मार्गदर्शसत्राचे अयोजन करून इतर शिक्षकांना प्रशिक्षण देन्याचे कार्य सचिन म्हात्रे अविरतपने करत आहेत.

शिक्षण क्षेत्रात आजवर केलेले उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन महाराष्ट्र शासनाने या वर्षीचा राज्य आदर्श शिक्षक हा पुरस्कार सचिन म्हात्रे यांना प्रदान केला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सचिन म्हात्रे यांचे सर्वस्तरातून कौतूक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

