
अर्धापूर। येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी सुभाष दतराम कुरे व त्यांच्या संघाने सतराव्या राष्ट्रीय फेडरेशन कप रस्सीखेच या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत कांस्यपदक पटकावले.
हरयाणातील पंचकुला येथे पार पडलेल्या सतराव्या राष्ट्रीय फेडरेशन कप रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष गटांच्या संघाला ६४० किलो वजन गटामध्ये कांस्यपदक मिळाले आहे . या संघात नांदेडच्या आठ खेळाडूंचा सहभाग होता. त्या आठ खेळाडूंमध्ये अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी संतोष दत्तराम कुरे याचा समावेश होता. १८ ते २० फेब्रुवारी या काळात ही स्पर्धा पार पडली.

कांस्यपदक प्राप्त संघामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या महाविद्यालयाचा विद्यार्थीने नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के. पाटील यांनी खेळाडूच्या वडिलांच्या उपस्थितीत महाविद्यालयात सत्कार करून शुभेच्छा दिल्यात. या विद्यार्थ्यास महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.विक्रम कुंटूरवार यांचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.मधुकर बोरसे, डाॅ.पठाण जे.सी., डाॅ.विलास चव्हाण, डॉ.लक्ष्मण वाघमारे, डाॅ.साईनाथ शेटोड, डाॅ.एस.पी.औरादकर, प्रा.स्वाती मदनवाड, डाॅ.रघुनाथ शेटे, डाॅ.के.ए.नजम, डाॅ.आर.बी.पाटील, डाॅ.बिराजदार एस.जी., डाॅ.विशाल बेलुरे, डाॅ.काझी मुख्तारोद्दिन देळुबकर, प्रा.शरद वाघमारे, कार्यालयीन प्रमुख बी.के.गायकवाड, डाॅ.पचलिंग एस.जी., अनिल पत्रे, सुहास कदम, यांच्यासह प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

