
नांदेड। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सीटू व जमसंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन मागील दोन दिवसापासून सुरु आहे.

आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे.उन्हापासून बचाव व्हावा म्हणून आणलेली प्लास्टिक पन्नी लावण्यास पोलिसांमार्फ प्रतिबंध केल्याने कडक उन्हात महिलांचे दिवसभर धरणे सुरु आहे.प्रशासन एवढे कठोर व निष्ठुर का झाले असा प्रश्न आंदोलक महिलांना पडला असून संताप व्यक्त होत आहे. मागील प्रलंबित मागण्यासह कामगार कष्टकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२३ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू आहे.

केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांचा नांदेड दौरा असल्यामुळे व सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी जाण्याचा त्यांच्या ताफ्याचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून असल्यामुळे बहुधा आंदोलकांना टेंट किंवा सावलीसाठी उपाययोजना करु देऊ नयेत आशा सूचना पोलीस विभागास देण्यात आल्या. असाव्यात परंतु स्वातंत्र्याच्या पंचहातराव्या व अमृत महोत्सवी वर्षांमध्ये किरकोळ मागण्यासाठी अमरण उपोषण किंवा धरणे आंदोलन करावे लागते. म्हणजे देशात आर्थिक विषमतेची दरी अत्यंत जलद गतीने मार्गक्रमण करीत आहे असा अर्थ निघतो आहे. नांदेड मध्ये तात्पुरत्या समाधानासाठी जिल्हाधिकारी कार्यालया कडून संबंधित विभागास पत्र काढून योग्य कारवाई करण्यासाठी कळविण्यात येत आहे आणि आपण आपले आंदोलन थांबवावे असे लिहून आंदोलकांना लेखी कळविण्याची प्रचलित पद्धती अस्तित्वात आणण्यात आली आहे.

यामुळे वेळमारून आंदोलन उठविले जाते परंतु कायम प्रश्न सुटू शकत नाहीत असे मत माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जोपर्यंत समाधानकारक कारवाई होणार नाही तो पर्यंत आमचे सुरु असलेले आंदोलन थांबविण्यात येणार नाही आणि जिल्हाधिकारी यांचे पत्र आंदोलन उठविण्यासाठी हत्यार म्हणून वापरण्यात येत आहे असे मत कॉ.गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

नांदेड रेल्वे स्टेशन येथे कार्यरत असलेल्या जगदेव इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे उप ठेकेदार श्री लोंढे, व्यवस्थापक श्री परनाटे व पीएनबी बँकेच्या दोषी अधिकारी यांनी संगणमत करून सिटूच्या कामगारांचे पैसे परस्पर उचलून गैरव्यवहार केला आहे तसे सर्व पुरावे उपलब्ध आहेत आणि अर्जदार हे अनुसूचित जाती पैकी असून त्यांनी ऍट्रॉसिटी ऍक्ट व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी घेऊन आंदोलन सुरु केले आहे.त्या संबंधित दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व भादवी कलम ४२० नुसार गुन्हे दाखल करावेत.ही मागणी करण्यात आली आहे.

नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्यामंदिर गांधीनगर या शाळेच्या विरोधात मागील दोन वर्षांपासून पुराव्यासहित अनेक तक्रारी दिल्या असून अनेक आंदोलने झाली आहेत परंतु गटशिक्षणाधिकारी पं.स. नांदेड शिक्षण अधिकारी (प्रा.) जि.प.नांदेड व नांदेड तसेच महापालिका आयुक्तांनी अर्थपूर्ण हितसंबंधातून अद्याप कारवाई केली नाही त्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करावी व मृत्यूशील झुंज देत असलेल्या सहशिक्षिका आशा गायकवाड व केशव धोंगडे यांना न्याय द्यावा अशी मागणी असून शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी यांनी लेखी कळविले आहे की आमच्या काक्षेत हे बसत नाही हे संशय येण्यासारखे आहे.

नांदेड जिल्ह्यातील जमीन मुद्रांक व दस्त नोंदणी घोटाळा कॉ. गंगाधर गायकवाड यांनी उघडकीस आणला तेव्हा पासून मूळ मागण्याप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यासह मुद्रांक महानिरीक्षक पुणे आणि राज्याच्या महसूल मंत्र्याकडे व इतर वरिष्ठाकडे केली असून या घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर फौजदारी आणि भादवी प्रमाणे गुन्हे दाखल करावेत व सर्व दोषींना सेवेतून निलंबित करावे आणि माकपाच्या मूळ निवेदनातील मागण्याप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
माहूर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) यांनी कर्तव्यात कसूर केला असून त्यांचे अग्निशस्त्र मागील सहा महिन्यापासून गहाळ आहे ते वन संपतीचे रक्षण करु शकत नाहीत त्यांनी म्हणून त्यांचे अग्निशस्त्र मिळेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस संरक्षण व शस्त्र परवाना संदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर करताना काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
नांदेड जिल्ह्यातील राज्य व केंद्र सरकारच्या विविध कार्यालयातील अनेक अधिकारी कर्मचारी कार्यकाल समाप्त होऊन सुद्धा वशिलेबाजीने आर्थिक लाभाच्या पदावर ठाण मांडून बसले आहेत त्यांची हकालपट्टी करावी जेणेकरून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांच्याकडून पदाचा गैरवापर होणार नाही. पीडित सोनाजी कांबळे यांचे नांदेड शहरात पुनर्वसन करावे व त्यांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन देण्यात यावी. वझरा शेख फरीद तालुका माहूर येथे गावठाण विस्तार योजना अंतर्गत कुंभारी सोलापूरच्या धर्तीवर नवीन प्लॉट पाडून घरकुल बांधून द्यावेत. या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी माहूर तहसीलदार यांना लेखी पत्र काढून कळविले आहे परंतु माहूर तहसीलदार हे खूपच उदासीन आहेत.
महापालिकेचे सफाई कामगार मयेत चांदोबा भिवा भिसे यांचे कर्तव्यावर असताना कोरोना काळात निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी व त्यांच्या एका मुलाला सफाई कामगार म्हणून महापालिकेत नोकरीवर घेण्यात यावे. बजरंग कॉलनी, गुरुनगर, शिवपार्वती नगर,कर्मवीर नगर,खूरगाव, नांदुसा, चिखली व नांदेड शहरातील महिलांची लक्षणे उपस्थिती होती. त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तातडीने महापालिका आयुक्त व तहसीलदार नांदेड यांना लेखी कळविण्यात यावे व योग्य कारवाई करावी अशी देखील मागणी करण्यात आले आहे.
आंदोलनाचा तिसरा दिवस आंदोलनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड कॉ. उज्वला पडलवार, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे,कॉ.सं. ना.राठोड,कॉ.सुभाषचंद्र गजभारे, कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.गंगाधर खुणे, कॉ.दत्ता जोगदंड, जीगीर सिंग गील, कॉ.गोपी प्रसाद गायकवाड, कॉ.अनुसया कांबळे, आधी जन उपस्थित आहेत. येत्या २७ फेब्रुवारी पासून आणखी किमान सत्तर आंदोलक अमरण उपोषणास बसणार असून आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.
