
हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव शहरातील मध्यभागी असलेल्या शासकीय धान्य गोदाम ( वखार ) परिसरातील अस्वच्छतेने कळस घातला असून दारुडे, लघुशंका, पाठीमागे वाढलेले झाडे-झुडुपे यामुळे अक्षरशा घाणीचे साम्राज्य पसरले असून पूर्ण तालुक्यात अंदाजे १७० स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या धान्य बाबत हजारो गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा बाबतीत संबंधित पुरवठा विभागाच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. तरी तालुक्यातील जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर संबंधित पुरवठा विभाग हे मूग गिळून गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

हदगाव पुरवठा विभागाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे धान्य वाटप केला जातो पण शहराच्या मध्यभागी असलेल्या शासकीय गोदामाच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे जिथे पूर्ण तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी आलेला गहू – तांदूळ ठेवला जातो त्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असून दररोज तिथे घोळक्याने जमाव जमवून दारू पिणे समोरील दुकानदार हे लघु शंके साठी परिसरातील जागा वापरणे तर धान्य गोदामाच्या पाठीमागे झाडे- झुडुपे चांगल्याच उंचीपर्यंत वाढले असून संबंधित विभागाने नुसतेच याकडे डोळे झाक केली आहे.

सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा यांना अधिकार कोणी दिला असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या धान्याच्या स्वच्छतेबाबत मोठा प्रश्न उभा होत आहे? तरी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे असे धान्य गोरगरीब जनतेच्या माथी पडणार असून आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आता किती दिवस चालणार की संबंधित विभाग या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवते हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे.

