
श्रीक्षेत्र माहूर,राज ठाकूर। माहूर शहरातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे कनिष्ठ लिपिक बालाजी मष्णा येसमोड वय ४७ वर्षे राहणार सलगरा (बु) तालुका मुखेड जी, नांदेड यांनी वस्तीगृहाच्या वरच्या मजल्यावरील संगणक कक्षात दि.२४ फेब्रु. च्या रात्रीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

आदिवासी शासकीय मुलांचे वस्तीगृहात आठवी ते पदवी पर्यंतचे ५६ विद्यार्थी असून गृहपाल, वॉचमन व एक कनिष्ठ लिपिक असे एकूण तिन कर्मचारी येथे कार्यरत आहे. मयत बालाजी हे ४ महिण्या पुर्वी येथे रुजू झाले होते. दि.२५ रोजी सकाळी ७ वा गृहपाल गोविंद भोसले हे वस्तीगुहात आले असता संगनक कक्षात त्यांना बालाजी हे फाशी घेतलेले अवस्थेत दिसले असता त्यांनी पोलीसांना माहीती दिली.

बालाजी यांचे पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी आहे.त्यांच्या डाव्या मांडी जवळ रक्ताचे दाग दिसून आल्याने पत्नीसह आलेल्या नातेवाईकांनी घातपात झाल्याची शंका वर्तवली आहे. पोहेका बाबू जाधव गृहरक्षक दलाचे शे,रज्जाक स. पो. नि. संजय पवार यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, व शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैघकिय अधिकारी डॉक्टर आर जी, बोडके यांनी शवविच्छेदन केले व मुत्तदेह विलास येसमोड यांच्या ताब्यात दिला.

घटना कळताच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी किनवट श्रीमती नेहा भोसले यांनी शिक्षण विस्तार अधिकारी किरण बोर्डेजोशी वरिष्ठ लिपिक आनंद मेथे यांना घटनास्थळावर पाठवून माहिती घेतली आहे. आत्महत्या चे नेमके कारण समजले नसून अकस्मीत मुत्ताची नोद करण्यात आली असून पुढील तपास सपोनी संजय पवार करीत आहेत.

