
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम ह्या होत्या. तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. दत्ता कोल्हेकर हे लाभले होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ. डी. के. कदम, नॅक समन्वयक प्रा.डॉ. गजानन दगडे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ. वसंत कदम तसेच प्रा. संदीपाल निखाते हे मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व तदनंतर शिवजन्मोत्सव समितीचे आयोजक प्रा.डॉ. वसंत कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. त्या नंतर विद्यार्थ्यांपैकी एक प्रातिनिधिक म्हणून निलेश चटणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ. दत्ता कोल्हेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण कार्यकौशल्यावर नव्यानेच प्रकाश टाकला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात सर्व जाती, धर्माच्या, लोकांचा सहभाग होता तसेच गोर ,गरीब,श्रीमंत सगळ्यांनाच सोबत घेऊन त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनामध्ये मुस्लिमांचेही मोठ्या प्रमाणात योगदान होते. यावर अनेक दाखले देऊन आपल्या व्याख्यानातून सविस्तर रुपाने त्यांनी विद्यार्थ्यां समोर आपले विचार मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी छत्रपती शिवरायांचा संघर्ष, त्याग ,पराक्रम व शौर्या विषयी मोजक्या शब्दात मांडणी करून .कवी भूषण यांच्या काव्यपंक्तीही त्यांनी अधोरेखित केल्या.

सदरील शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भारदस्त सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तर आभार प्रा. संदीपाल निखाते यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

