
नांदेड। मराठी भाषा दिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसाप शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर आणि कार्यवाह प्रा. महेश मोरे यांनी दिली आहे.

सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह परिसरात असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेत शाखा नांदेड च्या कार्यालयात होणाऱ्या या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे राहणार असून या कवी संमेलनाचे उद्घाटन दैनिक प्रजावाणी चे संपादक शंतनू डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. अशोक पाटील गवते आणि विजयकुमार भोपी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार अभंगे हे करणार आहेत.

या कार्यक्रमात नांदेड येथील डॉ. हंसराज वैद्य,रविचंद्र हडसनकर,देवीदास फुलारी,शंकर वाडेवाले,भगवान अंजनीकर, नागनाथ पाटील,दिगंबर कदम,शिवाजी अंबुलगेकर,पी. विठ्ठल, राजेंद्र गोणारकर,वैजनाथ अनमुलवाड, श्रीनिवास मस्के,मनोज बोरगावकर, मारुती मुंडे, अशोककुमार दवणे,अनुरत्न वाघमारे,डॉ. कल्पना जाधव,मार्तंड कुलकर्णी, विजय बंडेवार,विश्वाधार देशमुख, आशा पैठणे,योगिनी सातारकर,रोहिणी पांडे, ज्योती गायकवाड, गोदावरी गायकवाड,बालिका बरगळ,रुचिरा बेटकर, अंजली मुनेश्वर,उषा ठाकूर,वंदना मघाडे, ज्योती कदम,स्वाती कान्हेगावकर, वसुंधरा सुत्रावे, संगीता घुगे यांच्यासह अनेक दिग्गज कवींची हजेरी लागणार आहे. या कवी संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शाखा नांदेड चे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, कार्यवाह प्रा. महेश मोरे आणि शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.

