
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे,व तानाजी शेळगावकर, तसेच दीपक गजभारे यांचा नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पालघर येथून आलेले नायगाव पोलीस ठाणे येथे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल तसेच गाव माझा न्यूज मिडियाचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर यांची गाव माझा कोर कमिटीच्या चेन्नई येथील ट्रेनिंग साठी निवड झाल्याबद्दल तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मिडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच दिपक गजभारे यांची वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नायगाव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या कार्यालयात सन्मान करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, सहसचिव रामप्रसाद चन्नावार, गाव माझाचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर, वाचकमंच तालुका प्रतिनिधी परमेश्वर जाधव, युगांतरचे तालुका प्रतिनिधी धम्मदीप भद्रे, हणमंत चंदनकर, प्रशांत वाघमारे, किरण वाघमारे, दीपक गजभारे, शिवाजी कुटुंरकर, शिवाजी पाटील बेंद्रीकर,माधव गिरगावे,पवण देगावे,कॉनिस्टेबल इंगोले, ईत्यादीची उपस्थिती होती,

