
नांदेड| केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी हे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानास भेट दिली असता चिखलीकर परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करुन अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराची चांदीची प्राकृतिक भेट दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काल नांदेड दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी सायंकाळी ना.गडकरी हे खा.चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साई सुभाष निवासस्थानास भेट दिली. यावेळी संपूर्ण चिखलीकर परिवाराच्या वतीने ना.गडकरी यांचे स्वागत केले.गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देशवासीयांना अयोध्येतील राममंदिराची अनमोल भेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिली आहे. आगामी एक वर्षात राम मंदिर पूर्ण करुन समस्त रामभक्तांना दर्शनासाठी खुले करणार आहेत.

त्याचीच आठवण म्हणून चिखलीकर परिवाराने जळगाव येथील कारागिराला खास ऑर्डर देऊन चांदीची राम मंदिराची प्रतिकृती बनवून आणली होती. खा.चिखलीकरांची ही भेट अविस्मरणीय असलेल्यांची बोलकी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चिखलीकर परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले, त्यावेळी खासदारांचे पुत्र भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, डॉ.माया चिखलीकर, वैशाली प्रविण पाटील चिखलीकर यांच्यासह बच्चे कंपनी उपस्थित होते.

