
नांदेड| नांदेड जिल्हा दिवाणी व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारत कोणशीला व भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मामा चौक, नवीन कौठा नांदेड येथे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बॅरिस्टर राजीव शिवाजीराव जाधव यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा मुख्य न्यायाधीश मा. नागेशजी न्हावकर हे अध्यक्षस्थानी होते तर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष तथा औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ॲड.व्ही.डि.साळुंखे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. सतीश पुंड, मा. शशिकांत बांगर, जिल्हा न्यायाधीश नांदेड यांच्यासह विधी व न्याय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील मुळगाव उमरदरी असलेल्या ता. मुखेड येथील बॅरिस्टर राजीव शिवाजीराव जाधव यांचा या कार्यक्रमात ॲड.व्ही. डी. साळुंखे व ॲड. सतीश पुंड व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बॅरिस्टर राजीव शिवाजीराव जाधव हे शिक्षणतज्ज्ज्ञ तथा जनता शिक्षण प्रसारक मंडळ, उमरदरी ता.मुखेडचे संस्थापक अध्यक्ष नागोराव माधवराव जाधव यांचे नातू असून त्यांनी इंग्लंड येथे एलएलएम व बॅरिस्टर पदवी प्राप्त करून आपल्या आजोबा आई- वडिलांचा आणि एकूणच जाधव कुटुंबियांचा नावलौकिक व सन्मान वाढवलेला आहे. यानिमित्त त्यांचे विधी व न्याय, शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय आणि ग्रामीण क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे

