
हिमायतनगर। रेल्वेतून पडून मरण पावलेल्या धोडींबा कांबळे कुटूंबास आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि.26 फेब्रु.ला भेट देवून सात्वन करुन 10 हजाराची रोख मदत केली . रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सांगून घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न करनार आहेत.

या प्रसंगी मार्केट कमेटीचे माजी संचालक रफीक सेठ यांनी एक किटल तांदूळ देवून कांबळे परिवारास सहकार्य केले. कांबळे मयत झाल्या दुसर्या दिवशी अनगुलवार सरांनी काही किराणा व 50 किलो शेतातील गहू देवून मदत केली होती. आज या वेळी उपस्थित रफीक सेठ, ता.काॅ. अध्यक्ष जनार्धन ताडेवाड, चेअरमन गणेशराव शिंदे, लोकमत ता.प्र. अशोक अनगुलवार ,सरपंच परमेश्वर गोपतवाड ,संजय राऊत, गजानन गोपेवाड, संतोष अनगुलवार, आदीसह गावकरी हजर होते.

मेडिकल आसोशियशनच्या वतीने अध्यक्ष शंकर पाटील, व पदाधिकारी यांनी रोख 11 हजार व 4 हजाराचा किराणा किट दिला आहे.या प्रसंगी, दिलीप अनगुलवार, सोनबा राऊत, अशोक अनगुलवार ,परमेश्वर गोपतवाड,बंडू गायकवाड, बालाजी आलेवाड मेडिकलवाले, रितेश पिंचा, देवसरकर सह केमिस्ट हजर होते. डाॅ. अभिमन्यू केंद्रे हे त्याचा मुलगा परिक्षीत केंद्रे यांच्या वाढ दिवसा निमित्य कोलम 50 किलो तांदूळ उद्याला पाठविणार आहेत. वैद्यकीय अधिकारी केंद्रे व आरोग्य कर्मचारी चौधरी यांनी सांगीतले आहे.

