
नांदेड| डॉ.शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली. राज्याचा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री म्हणून काम करताना त्यांनी कधीच शासकीय व्यवस्थेचा स्वतःसाठी वापर केला नाही. सत्तेतून जनसामान्यांचे हित करण्याचे त्यांनी काम केले. म्हणून त्यांना भाग्यविधाते या उपाधीने संबोधित करण्यात येते. डॉ. शंकरराव चव्हाण म्हणजे जनसामान्यांसाठी काम करणारे नेते होते असे प्रतिपादन माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले. डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित केलेल्या अभिवादन सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या हिमालयाएवढ्या प्रचंड नेतृत्वाचे अनेक पैलू आपल्या भाषणातून उपस्थितांना उलगडून सांगितले. यावेळी माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, ॲड.सुरेंद्र घोडजकर, माधवराव पाटील शेळगावकर, डॉ.सौ. मिनलताई खतगावकर, किशोर स्वामी, आनंद चव्हाण, मंगाराणी अंबुलगेकर, मंगलाताई निमकर, बी.आर.कदम, कविताताई कळसकर, सुमती व्याहाळकर, अनिता इंगोले, स. विरेंद्रसिंघ गाडीवाले, मुन्ना अब्बास, नारायण श्रीमनवार, सुनंदा देशमुख, ललिता कुंभार, दिपक पावडे, नवल पोकर्णा, उमाकांत पवार, राजेश पावडे, लक्ष्मीकांत गोणे,बालाजी पांडागळे, कविता सोनकांबळे, आशा पारवेकर, सुषमा थोरात, श्रीमती कादरी,

शिवाजी पवार, सुभाष देशमुख, विजय शेळगावकर, मनोहर पवार, बालाजी मद्देवार, संजय पांपटवार, ॲड.रुपानी, दिनेश मोरताळे, मुन्वर शेख, राजकमल गाडीवाले, हनमंत मालेगावकर, भुमन्ना आकेमवाड, मोहमद नदीम, माधव दूधभाते, वसंत यशवंतकर, दत्तात्रय शिंदे, सुभाष पाटील, अनिल कांबळे, रवी शर्मा, ॲड.अर्जुन गवारे, राजेश बेंबरे, श्रीनिवास बंडेवार, चंद्रमुनी लोणे, ॲड. बालकृष्ण शिंदे, भि.ना. गायकवाड, शेख हुसेनी, सत्यपाल सावंत, सुभाष काटकांबळे, आदींची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर व स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले.

