
उस्माननगर। मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या नविन व जुण्या सदस्य नोंदणीचे अभियान दि. २२फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान चालु आहे. दि. २५ फेब्रुवारी रोजी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या पत्रकारांची नोंदणी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात करण्यात आली ,यास उस्माननगर परिसरातील पत्रकार बांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी उस्माननगर विभागातील पत्रकार बांधवांच्या वतीने प्रमुख अतिथी जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांचे स्वगत करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करताना म्हणाले की ,परिसरातील पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करूण नोंदणी करण्याची विनंती जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केली आहे. व्यासपीठावर पत्रकार राम तरटे, सोमनाथ पाटील लोंढे उपस्थित होते.ते उस्माननगर येथे पत्रकार सदस्य नोंदणी निमित्त मार्गदर्शन करीत होते.ग्रामणी भागात पत्रकारीता करणे मोठे कष्टाचे काम आहे.ग्रामीण पत्रकारांची आर्थिक परिस्थिती खुप नाजुक असते. एवढ्या सगळ्या समस्यांवर मात करीत उस्माननगर पत्रकार एकजुटीने पत्रकारिता करत आहेत ,आणि त्यांच्या एकजुटीचे द्योतक म्हणजे सुसज्य उस्माननगर पत्रकार भवन उभारण्यात ते यशस्वी झाले आहेत. असे गौरवोद्गार कार्याध्यक्ष संतोष पांडागळे यांनी काढले.पत्रकार भवनासाठी ग्रामपंचायत ने जागा उपलब्ध करुण दिल्याबद्दल व बांधकामासाठी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांनी भरीव निधी दिल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. भविष्यात कोणत्याही पत्रकाराच्या कुटुंबावर दुर्दैवी प्रसंगी कुटुंबाला मदत करतायावी यासाठी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दहा लाख रुपयाच विमा काढण्यात येणार आहे.त्यासाठी सर्वांनी पोस्टात लवकरात लवकर खाते काढुन घेण्याच्या सुचना दिल्या.

भविष्यात कोनत्या ही प्रसंगी जिल्हा पत्रकार संघ सर्व पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, पत्रकार भवनाच्या उर्वरित विकासासाठी पाच लाख रुपयांचा निधी मिळवुन देनार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस राम तरटे, उस्माननगर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार सूर्यकांत मालीपाटिल यांनी मानले. यावेळी पत्रकार देविदास डांगे,माणिक भिसे,लक्ष्मण कांबळे शिराढोणचे पत्रकार शिवकांत डांगे,शुभंम डांगे, मारतळ्याचे पत्रकार गणेश ढेपे, बालासाहेब शिंदे,संजय देशमुख, उत्तम हंबर्डे, यांच्या सह शिराढोण,मारतळा परिसरातील पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.

