
नांदेड| भारतातील अत्यंत नामांकीत असलेल्या नवी दिल्ली येथील इंडियन एग्रीकल्चर रिसर्च, इन्स्टिट्यूटचा आय.ए.आर.आय. इनोव्हेटिव्ह फार्मर्स रेकगनायजशेन पुरस्कारासाठी सायन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ.मनोज शर्मा यांना जाहीर झाला आहे.

कृषीक्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कामगिरी बद्दल दिल्ली येथील एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे आय.ए.आर.आय. इनोव्हेटिव्ह फार्मर्स रेकगनायजशेन पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा हा पुरस्कार नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स महाविद्यालयातील माजी विद्यार्थी डॉ.मनोज शर्मा यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार त्यांना पुसा कृषी विज्ञान मेला 2023, आय.ए.आर.आय., नई दिल्ली येथे दि. 4 मार्च 2023 रोजी भारताचे कृषी मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

त्याच्या या भरीव योगदानाबद्दल नांदेड एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सिए डॉ. प्रविण पाटील, सचिव श्यामल पत्की, सहसचिव प्रफुल्ल अग्रवाल, शालेय समितीचे अध्यक्ष ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर व अल्युमिना असोसिएशनचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. डी. यु. गवई सचिव व उपप्राचार्य प्रा. डॉ. एल. पी. शिंदे, उपप्राचार्य डॉ.अरुणा शुक्ला, उपप्राचार्य प्रा. एकनाथ खिल्लारे व फिशरीज विभागप्रमुख डॉ. किरण शिल्लेवार सर्व प्राध्यापक तसेच सायन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी ऍड. रविंद्र रगटे व मित्र मंडळ यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

