Tuesday, March 21, 2023
Home महाराष्ट्र कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी -NNL

कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी -NNL

गोहत्या बंदी कायद्याला विरोध करणार्‍या कम्युनिस्टांना अचानक गो-प्रेमाचा उमाळा !

by nandednewslive
0 comment

कोल्हापूर| येथील कणेरी मठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ 20 फेब्रुवारीपासून चालू आहे. हा महोत्सव चालू असतांना काही गायींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मुळात ही घटना दुर्दैवी आहे. भारतीय प्राचीन संस्कृती जोपासणार्‍या कणेरी मठाच्या वतीने गेली अनेक वर्षे सहस्रो गायींचा सांभाळ केला जात आहे.

भाकड आणि भटक्या गायींनाही सांभाळणारी आदर्श गोशाळा येथे आहे. असे असतांना तेथे गायींचा झालेला आकस्मिक मृत्यू हे एक षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरेतर कणेरी मठ आणि प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी यांचे पर्यावरण प्रेम निर्विवाद आहे अन् ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. जे साम्यवादी आणि समाजवादी गोवंश हत्या बंदी कायद्याला विरोध करतात आणि शेतकर्‍यांच्या भाकड गायी कत्तलखान्यात जाव्यात यासाठी उघड भूमिका घेतात.

तेच साम्यवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीने अनेक गायी विकल्या, तसेच अनेक गायींच्या पोटात चोळीचे खण आणि प्लास्टिक पिशव्या सापडल्या, त्या वेळी कुठल्या बिळात लपून होते ? आज मात्र या साम्यवादी आणि समाजवाद्यांना अचानक गोप्रेमाचा उमाळा का आला ? यामुळेच त्यांनी घेतलेली भूमिका ही दुटप्पीपणा ची आहे, हेच यातून दिसून येते. खरेतर मठामध्ये चालू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाचे यश समाजविघातकांना खुपले आहे. त्यामुळेच या दुर्घटनेच्या निमित्ताने प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी आणि कणेरी मठ यांची अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे कणेरी मठातील गायींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यामागील षड्यंत्र उघड करायला हवे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संपूर्ण हिंदु समाज कणेरी मठाच्या पाठीमागे उभा आहे.

…..श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 70203 83264)

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!