
मुखेड। वर्ताळा येथील श्री संत माणिकराव महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जि.प. प्रा.शाळा वर्ताळा येथे ‘ग्रंथालय शाळेच्या दारी’ या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवी जायेभाये होते, उद्घाटक म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष शेषराव गुरुजी डावकरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, अॅड. पी.जी. आगलावे, वाचनालयाचे सचिव उत्तमराव आगलावे, आम आदमी पार्टीचे नामदेव बोमनवाड, अॅड. तानाजी वाघमारे, श्रीराम पाटील आगलावे, मधुकर पाटील कांगणे, प्रा. संभाजीराव डावकरे, भारत गुरुजी जायेभाये, एम.टी. गायकवाड, तंटामुक्तीचे नामदेव आगलावे, विठ्ठल चमकुरे, भगवान शिंदे, वाचनालयाचे ग्रंथपाल भाऊसाहेब आगलावे, गंगाधर मुंडे, युवा कार्यकर्ता कैलास
महाराज पूरी, लक्ष्मण कागणे, जैवंत बाबुळसरे, मोहन बाबूळसरे, बालाजी कल्याने, सुमेश डावकरे, महेबुब सय्यद यांची उपस्थिती होती. प्रारंभी ग्रंथालय शाळेच्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर शेषेराव गुरुजी डावकरे म्हणाले की, ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ज्ञानरुपी साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण – घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. यावेळी अॅड. तानाजी वाघमारे, नामदेव बोमनवाड, एम.टी. गायकवाड, श्रीराम पाटील आगलावे, प्रा. संभाजीराव डावकरे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे सचिव उत्तमराव आगलावे यांनी केले. सुत्रसंचालन सहशिक्षक भगवान शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथालय भाऊसाहेब आगलावे यांनी मानले. कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, ग्रंथालय प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक शिवाजी कांबळे यांच्यासह शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

