
नांदेड| नांदेडहून कंधार, लोहा येथे जाणा-या बसेसना विद्यापीठ व सरकारी दवाखाना येथे थांबा देण्याचे आगार प्रमुख आशीष मेश्राम यांनी मान्य केली आहे. या परिसरात बस थांबा मिळाल्याने प्रवाश्यातून आनंद व्यक्त होत आहे.

विश्वासू प्रवासी संघटनेची ही मागणी पाठपुरावा करून मान्य करून घेतल्याबद्दल प्रा.डाॅ.परमेश्वर पोळ यांनी विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर व आगार प्रमुख आशिष मेश्राम यांचा सत्कार केला. यावेळी हरजिंदरसिंघ संधू, रमाकांत घोणसीकर यांची उपस्थिती होती.

गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड-लोहा/कंधार दरम्यान चालणाऱ्या बस विद्यापीठ व डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे थांबत नसल्यामुळे गरीब विद्यार्थी, मुली, महिला, बाहेरून आलेल्या प्रवाश्यांना विद्यापीठास जाण्यास यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांनी विद्यापीठ व सरकारी दवाखाना येथे बस थांबा द्या ही मागणी नांदेड आगार प्रमुखांकडे लावून धरली होती.

विद्यापीठ हे मराठवाड्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून येथे जाण्यासाठी बस थांबा मिळणे गरजेचे होते. या भागातील विद्यार्थी व प्रवाश्यांची अडचण दूर करण्यासाठी विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांनी वेळोवेळी प्रशासनासोबत चर्चा करून विद्यापीठ व सरकारी दवाखाना येथे बसथांबा मंजूर करून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार – प्रा.डाॅ. परमेश्वर पौळ.

