
नांदेड| पुण्यश्लोक राजमाता लोकमाता न्याय देवता माता अहिल्यादेवी होळकर यांची 2025 मध्ये 300 वी जयंती येत आहे तरी आपल्या पुर्ण भारत देशात जयंती साजरी व्हावी त्या निमित्त केंद्र सरकार तर्फे आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र धनगर जमाती व मौर्य प्रतिष्ठान जि.नांदेड तर्फे गोविंद गोरे यांनी केद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची वर्ष 2025 ला 300 वी जयंती येत आहे, आणि 300 जयंती पुर्ण भारतात साजरी व्हावी अहिल्या मातेने सर्व भारत भर गोरगरीब जनतेसाठी कार्य केल एकट्या धनगरसाठी नसुन सर्व अठरापगड जमातींच्या हिताचे कार्य केले आहे विशेषतः महाराष्ट्र मध्ये अहिल्या मातेचे जन्म स्थळ चोंठी येथे जि.अहिल्यानगर येथे दर वर्षी पेक्षा 300 वी जयंती नंबर एक साजरी व्हायला पाहिजे ,सर्व देशात पण व्हायला पाहिजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्म स्थळ चौंडी ता. जामखेड जि.अहिल्यानगर साठी 300 व्या जयंती निमित्त 1000 कोटी रुपये मंजूर करून द्यावे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इंदोरवाड्यासाठी व शहरासाठी 1000 कोटी रुपये मंजूर करून द्यावे ,देशातील 12 महादेव जोतीलिंगाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेने केला त्या सर्व शिवमल्हार महादेव मंदिरासाठी 50 ते 100 कोटी रुपये मंजूर करून द्यावे महाराष्ट्र मधील प्रत्येकजिल्ह्याच्या ठिकाणी 200 *50 =10000 दहा हजार स्केर फूट चे पुण्यश्लोक अहिल्या भवन मंजुर करून त्यासाठी भरीव आर्थिक मदत मंजुर करून द्यावे,महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय देवता राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेचा घोड्यावर स्वार भव्य दिव्य पुतळा द्यावा त्यासाठी शहराच्या मुख्य ठिकाणी जागा मंजुर करून द्यावे.

,गेल्या आठ वर्षांत आपल्या भाजपा सरकारने लहान मोठ्या बऱ्याच समाजाला आरक्षण लागू केले आमच्या धनगर जमातींचा इतका मोठा कर्तबगार इतिहास असुन आमच्यावर अन्याय करू नये तत्काळ एस टी आरक्षण लागू करावे, नांदेड वाघाळा शहर म.पा.प्रभाक क्र 19 कौठा जुना येथे माजी नगरसेवक अभिषेक सौदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट मंजुर करून घेतला आज भाजपा नगरसेविका सौ.शांताबाई संभाजीराव गोरे ह्या आहेत तरी घाटासाठी दहा कोटी रुपये मंजूर करून देण्याची मागणी गोविंद विश्वनाथ गोरे, कोष्याध्यक्ष मौर्य प्रतिष्ठान जि.नांदेड, व अखिल महाराष्ट्र धनगर विकास संस्था पुणे जिल्हा अध्यक्ष नांदेड, महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच मुंबई जिल्हा अध्यक्ष नांदेड ,गजानन सरोदे पाटील यांनी प्रत्यक्ष भेटुन निवेदनाद्वारे केली आहे.

