नांदेड| विज्ञान- तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आलयं, पण माणूस माणसापासून दूर होतोय, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन डॉ. हेमंत कार्ले यांनी केले. जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आयोजित निरोप समारंभात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश बादशहा तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गणपतरावजी राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव गिरी उपस्थित होते. डॉ. कार्ले पुढे बोलताना म्हणाले की, चांगल्या करिअरसाठी जसे खूप कष्ट घ्यावे लागतात तसेच चांगला माणूस होण्यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात असेही प्रतिपादन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. कार्ले यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रा. शंकर विभूते यांचेही महापुरुषांच्या विचारांची उपयुक्तता या विषयावर समयोचित भाषण झाले. यावेळी श्रीधर जोशी, ऋषिकेश ढाके, प्राची हनमंते, मुक्ता सुर्यवंशी, श्रेया भोसले, पायल चुंचे, अंजली गिरी आदींनीही मनोगत व्यक्त केले.
या भावपूर्ण निरोप समारंभात जयश्री वडगावकर, राजकुमार गोटे, विठ्ठल पवार, रावसाहेब देवकत्ते, बालाजी क्षीरसागर, प्रलोभ कुलकर्णी, शिवाणी क्षीरसागर, करुणा वाघोळे, स्मीता भोसले, तेजस्विनी आठवले, स्नेहल हिंगमीरे, पल्लवी मोरे, साक्षी निवडंगे, देवराव भोसले आदी विद्यार्थी- शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.