
हदगाव, गजानन जिदेवार| सरकारच्या हाताखालची बाहुली बनलेल्या निवडणूक स्वायत्ता यंत्रणांना शिवसेना या पक्षाचे नाव व चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून खचून न जाता ठाकरेच आपला पक्ष व ठाकरेच आपले चिन्ह मानून पक्ष वाढीच्या कामाला जोमाने लागावे असे विचार शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले.

ते हदगाव येथे नांदेड जिल्हा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना संपर्क कार्यालयात शिवगर्जना अभियान निमित्ताने शिवसैनिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, आज भारतामध्ये स्वायत्त यंत्रनेला आपल्या हाताखालची बाहुली करत लोकशाही व्यवस्थेची गळचेपी केली जात आहे. त्या विरोधात आवाज उठवून जनतेमध्ये जनजागृती करणार व हत्तीचे बळ घेऊन त्या बळाच्या ऊर्जेचे रूपांतर शिवसेना वाढविण्या करिता करणार असून, कार्यकर्त्यांनी देखील “निष्ठेने पक्ष वाढीच्या कामाला लागाव असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख मा. आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.

यावेळी युवा सेना जिल्हा अध्यक्ष कृष्णा पाटील आष्टीकर , माजी उप जिल्हा प्रमुख रमेश घंटलवार ,तालुका अध्यक्ष सुभाष जाधव मनुलेकर , शामराव मामा चव्हाण, बाष्ठेवाड दिगंबर पाटील कदम वाळकीकर, बंडू पाटील तालंगकर ,प्रभाकर पत्तेवार ,गजानन पाटील धानोरकर, मुधोळकर सर, कुणाल भाऊ राठोड, अमोल रुईकर ,राजू पाटील हडसनीकर, योगेश पाटील सोनारीकर, राहुल भोळे ,संतोष फुलेवार, प्रल्हाद पाटील पोटेकर, पवन पाटील मोरे, साईनाथ पाटील सूर्यवंशी, बालाजी पाटील सूर्यवंशी, श्रीराम पाटील वाघीकर ,दत्ता पाटील कवळे ,अरविंद शिंदे ,विठ्ठलराव ठाकरे, बाळा माळुंदे, किशोर भोसकर ,उमेश शेवडकर ,आकाश लकडे ,मोबीन शेख, प्रकाश बिया, विलास वानखेडे ,सुनील पाटील हरडफकर, मंगेश पाटील हरडफकर, दिगंबरराव पाटील व इतर निष्ठावंत शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

