
शिवणी। किनवट येथील सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले व तहसीलदार डॉ.मृणाल जाधव आणि विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी राहणार उपस्थित. आज २८ फेब्रुवारी मंगळवार सकाळी ११ : ०० वाजता मानसिंग नाईक तांडा येथे आयोजित ‘प्रशासन आपल्या गावी’ या उपक्रमात सहभाग घ्यावा असे अवाहन तहसीलदार डॉ.मृणाल जाधव सह इस्लापुर शिवणी अप्पारावपेठ परिसरातील वाडी तांड्यातील सरपंचानी केले आहे.नागरिकांनी सहभाग नोंदवुन आपल्या विविध अडचनी सोडवून घ्याव्यात असे मत तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी व्यक्त केले.

तेलंगणाच्या सीमावर्ती भागात असलेल्या किनवट तालुक्यातील शिवणी परिसरातील वाडी-तांडे व गावांचा सर्वांगीण विकास व्हावा या साठी मागील काही दिवसांपासून या भागातील सरपंच मंडळींनी प्रशासनास लेखी निवेदने देऊन सर्व सामान्य जनतेच्या प्रशासकीय स्थरावरील विविध अडचणी दूर करून येथील नागरिकांना सोई सुविधा मिळाव्यात विविध कामासाठी ६० ते ७० किलोमीटर असलेल्या तालुक्याचे प्रवास कमी व्हावा व विविध कामापासून दिलासा मिळाला म्हणून आवाज उठवला होता.या अनुषंगाने किनवट येथील उपविभागीय कार्यालय तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी दि.२५ फेब्रुवारी रोजी किनवट च्या तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांना आदेशीत पत्राद्वारे दि.२८ फेब्रुवारी मंगळवारी रोजी “प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम” मानसिंग नाईक तांडा येथे राबविण्यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी आदेश दिले आहे.

शिवणी परीसरातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या तेलंगणाच्य सीमावर्ती भागावरील अप्परावपेठ सह मार्लागुंडा,मानसिंग नाईक तांडा,तोटंबा,दिपला नाईक तांडा,कंचली,पांगरपहाड, अंदबोरी,चिखली,येथील सर्व नवनिर्वाचित सरपंचांनी मागील अनेक दिवसांपासून या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे अधिकार,व हक्क आणि विविध नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून वेळेवेळी जिल्हा व तालुका प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे पत्र दिले होते.या विषयाची दखल घेत अखेर तालुका प्रशासनास “प्रशासन आपल्या गावी” या उपक्रमाचे नियोजन लावण्यास भाग पाडले.या अनुषंगाने आज दि.२८ फेब्रुवारी मंगळवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता इस्लापुर मंडळातील मानसिंग नाईक तांडा येथे प्रशासन आपल्या गावी हे उपक्रम राबविले जाणार असून सदरील उपक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या उपस्थितीत आयोजन होणार आहे.

यात उपविभागीय सार्वजनिक बांधकाम,गटविकास अधिकारी,महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी,उपअधीक्षक भूमिअभिलेख,तालुका कृषी अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,इस्लापुर, अप्पारावपेठ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी,सहायक निबंधक,विधुत वितरण अभियंता अधिकारी, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन इस्लापुर,शिवणी अप्पारावपेठ सह मार्लागुंडा, मानसिंग नाईक तांडा,तोटंबा,दिपला नाईक तांडा,कंचली, पांगरपहाड, अंदबोरी, चिखली,येथील सर्व ग्रामसेवक कृषी सहायक सह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत करिता इस्लापुर-शिवणी अप्पारावपेठ सह वरील सर्व वाडी तांडे गावातील नागरिकांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ या उपक्रमात सहभागी नोंदवून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात असे किनवट तहसीलदार डॉ.मृणाल जाधव सह सरपंच मंडळींनी अवाहन केले आहे.

