
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| पुज्य साने गुरुजी विद्यामंदिर देगाव या प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 25 फेब्रुवारी रोजी शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संचालक रावसाहेब मोरे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव देवाले यांची उपस्थिती होती.

शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आपल्या भावनांना वाट करून दिली. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप घेत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या.शालेय जीवनातील अनेक आठवणीना उजाळा दिला. यावेळी दहावीचे सर्व विद्यार्थी भाऊक झाले होते. शाळेतील सर्व शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री माधवराव देवाले यांनी विध्यार्थ्याला मार्गदर्शन करताना म्हणले की विध्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करावे लागेल अन त्या ध्येयाला पूर्णत्वाकडे न्यावे लागेल. त्यानंतर कडलवार सर व शिंदे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक माधव देवाले सर, रमेश शिंदे सर, धुळेकर सर, बेळगे सर, शहापुरे सर, कोंडावार सर, मोरे म्यॅडम आदीसह साने गुरुजी शाळेतील विध्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

