
श्रीक्षेत्र माहूर,राज ठाकूर। निक्रिय ग्रामसेवकास बदलून न दिल्याने गुंडवळ येथील सरपंच व गावकर्यानी आज पासून आमरण उपोषन करण्यात येणार असल्याचे निवेदन दिले आहे.

गावाचा सर्वांगिण विकास साधण्याकरीता आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये शासकीय अधिकारी म्हणुन ग्रामसेवकाची नियुक्ती केल्या जाते. शासनाच्या अनेक योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सचिवावर असते.

तसेच घरकुल, दारीद्रय रेषेखालील यादीत नावे समाविष्ठ असणाऱ्या परिवारा करीता विविध योजना, विविध फंडातिल कामाकरीता येणारा निधी अशा अनेक शासकीय योजना राबविणे व ग्रामस्थांना माहीती देण्याचे काम सचिवाचे असते. मात्र माहूर तालूक्यातील गुंडवळ येथील ग्रामसेवक शेषराव पंदीलवाड यांना ह्यांशी काही देणे -घेणे नसून मुख्यालयी न राहता नांदेड येथून महिण्यात चार दिवस येत असून सरपंच व ग्रामस्थाना उध्दट वागणूक देत असल्याचा आरोप सरपंच व उपसरपंच यांनी केला आहे.

सदरील ग्रामसेवक यांना बदलून देण्या करीता गटविकास अधिकारी सूरेश कांबळे यांना अनेक तोडी व लेखी तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांनी कोणतीही दखल न घेतल्याने अखेर दि,२४ फेब्रू रोजी सरपंच रामेश्वर जाधव उपसरपंच राहूल काबळे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन व स्मरण पत्र देउन दि,२६ पासून पंचायत समिती समोर गावकर्यान सोबत आमरण उपोषन करीत असल्याचे निवेदन दिले आहे.

