
नवीन नांदेड। मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. तिचे जतन करणे काळाची गरज आहे. अर्थात भाषेचे जतन म्हणजे भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन असते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले. वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी येथे मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन व ‘कवी श्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज’ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.व्यंकटेश देशमुख देशमुख, ईंग्रजी विभाग प्रमुख डॉ.जी वेणुगोपाल,मराठी विभाग प्रमुख डॉ. साहेबराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कवीवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठी विभागाच्या वतीने ‘वसंतदर्पण’ या भित्तीपत्रकाच्या मराठी ‘भाषा गौरव दिन विषेशांका’चे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशनही करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. साहेबराव शिंदे यांनी केले प्रास्ताविक करताना ते म्हणाले की, मराठी भाषेला गौरवशाली इतिहास लाभला आहे. कुसुमाग्रजां सारख्या थोर साहित्यिकांमुळे मराठी भाषा आणि साहित्य ज्ञानपीठा सारखा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला. तदनंतर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे आणि आपण मराठी भाषेचा वापर सर्व ठिकाणी करावा. आणि मराठी भाषा अधिक समृध्द करून दर्जा वाढवावा अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष हापगुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.शोभा वाळूककर यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.पी.एल. चव्हाण, डॉ प्रदीप बिरादार, प्रो. डॉ. रेणुका मोरे,डॉ.सुनिता गरूड, कार्यालयीन अधिक्षक श्री आर डी. राठोड, डॉ.आर.एम. कागणे , डॉ.नागेश कांबळे,डॉ. संजय गिरे, डॉ.दिलिप पालीमकर, डॉ.एम.के.झरे, डॉ.अनिल गच्चे , प्रा.डॉ.रंजना अडकिने,कार्यालयीन अधीक्षक श्री.आर.डी. राठोड प्रा.निराली काळगापूरे प्रा.कपिल हिंगोले. डॉ.गणेश लिंगमपल्ले,प्रा.संतोष शिंदे, डॉ. एन. आर. कांबळे, डॉ. लालबा खरात, डॉ.व्ही. व्ही. मोरे सर, प्रा. समाधान दराडे , प्रा.शशिकांत हाटकर, प्रा. शुभम कोकुलवार, शिक्षकेतर कर्मचारी मारोती कांबळे,रियाज शेख,बालाजी कोडतीवार, नागनाथ गेले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

