
नवीन नांदेड। मौजे असरजन, नांदेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा संपादीत केलेल्या जमीनीवर उभारण्यात येणाऱ्या ईमारतीस भागास कौठा ऐवजी असरजन नाव देण्याची मागणी राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल यांच्या सह नागरीकांनी न्यायाधीश यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

मौजे असरजन येथील प्रस्तावित मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अन्य शासकीय कार्यालय इमारती व निवासस्थाने बांधकामाकरीता साईट नं 6 व 7 ( गट नं 111 ते 120 ) असरजन या गावाची जमीन संपादन केली आहे. या संपादीत केलेल्या गट नं 118 व 119 असरजन येथील जमीनीमध्ये मा. न्यायालयासाठी जमीन संपादीत करण्यात आलेली आहे. परंतु दि. 25 फेब्रुवारी रोजी शासकीय पत्रिकेमध्ये मौजे कौठा असे गावाचे नांव नमुद करण्यात आले आहे.

वास्तविक कौठा या गावाची एक इंच सुध्दा जमीन न्यायालयासाठी किंवा प्रस्तावीत प्रशासकीय इमारत अन्य शासकीय अन्य शासकीय कार्यालय इमारती व निवासस्थाने बांधकामाकरीता साईट नं 6 व 7, ( गट नं 111 ते 120 ) संपादन झालेले नाही. गट नं 111 ते 120 असरजन साठी संपादन होणाऱ्या जमीनीचे भु-सपादन उप जिल्हाधिकारी (भुसंपादक) पाझर तलाव लसीका क्र. 2 यांच्या कार्यालयातर्फे झाले असुन सदर भु -संपादनाचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम यांनी पाठविले आहे.

पुर्ण भु-संपादनाची प्रक्रिया प्रस्तावीत प्रशासकीय इमारत, अन्य शासकीय अन्य शासकीय कार्यालय, इमारती व निवासस्थाने बांधकामाकरीता साईट नं 6 व 7, ( गट नं 111 ते 120 ) झालेली आहे, यामुळे सदरील ठिकाणी मौजे कौठा एैजवी मौजे असरजन साठी न्यायालयाचे नांमातर करावे. अशी मागणी राज्यपाल पुरस्कार प्राप्त असरजनचे पोलीस पाटील खंडेराव बकाल, नंदु गोविंदराव वैध, शिवाजी रामजी धुमाळ, सुभाष रामजी रगडे,राजु विठ्ठलराव रगडे, सिद्धांत बाळु खिलारे, खंडु गोविंदराव वैध, शिवाजी चांदु वैध, ऑड. जि.आर. हांडे यांनी केले आहे. सदरील निवेदनाचा प्रति विघमान जिल्हा सत्र न्यायाधीश, नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, बांधकाम अभियंता, सार्वजनिक बांधकाम नांदेड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

