उमरी/कर्नुल। कर्नुल येथील राज्यसभेचे मा. खासदार टी.जी. व्यंकटेश यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कर्नुल येथे आयोजित केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच मा.खासदार टी.जी. व्यंकटेश यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष तथा समाज भूषण नंदकुमार गादेवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई, बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष अनिल मनाठकर, विपिन गादेवार आदींची उपस्थिती होती.
मा. खासदार टी.जी व्यंकटेश यांनी कर्नुल येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या पदाधिकाऱ्यांना आला.हे माञ विशेष.